मिशेल यांनी वापरला भारतीय डिझायनरचा पोशाख
By admin | Published: January 26, 2015 04:47 AM2015-01-26T04:47:10+5:302015-01-26T04:47:10+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल यांचे आगमन आज भारतात झाले आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल यांचे आगमन आज भारतात झाले आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी एअर फोर्स वनच्या विमानातून उतरताना भारतीय डिझायनर बिभू मोहपात्रा यांनी डिझाईन केलेला फुलाफुलांचा पोशाख परिधान केला होता.
त्याला मॅचिंग असा कोट व काळे शूज अशा वेशात अमेरिकन फर्स्ट लेडी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या. मोहपात्रा अमेरिकेत वास्तव्यास असून, ते ओडिशातील रुरकेला येथील आहेत. मोहपात्रा यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली.
ओबामा व फर्स्ट लेडी मिशेल ओबामा भारतात येत असून, मिशेल ओबामा यांनी बिभू मोहपात्रा यांच्या स्प्रिंग कलेक्शनमधील फुलाफुलांचा पोशाख परिधान केला आहे, असे मोहपात्रा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले असून, त्यासोबत छायाचित्रही टाकले आहे. मिशेल यांनी याआधी जे लेनो यांच्या कार्यक्रमात २०१२ साली मोहपात्रांच्या कलेक्शनचा पोशाख वापरला होता.