मिशेल उलगडणार सगळ्यांची गुपिते, मोदींची सोनिया गांधींवर थेट टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 02:34 PM2018-12-05T14:34:58+5:302018-12-05T14:37:17+5:30
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगुस्टा वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
सुमेरपूर ( राजस्थान) - राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगुस्टा वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. सुमेरपूर येथील प्रचारसभेत अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात प्रत्यार्पण झालेल्या ख्रिश्चियन मिशेल मिशेलचा धागा पकडत नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर थेट टीका केली.
मोदी म्हणाले, 2014 च्या माझ्या सभांमधील माझ्या भाषणांमध्ये मी हेलिकॉप्टर घोटाळ्याबाबत उल्लेख केला होता. हजारो कोटींचा घोटाळा झाला होता. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर आणि ती चिठ्ठी तुम्हाला माहीत असेलच. मॅडम सोनियाजींची चिठ्ठी आहे. आमचे सरकार आल्यावर आम्ही कागदपत्रे शोधली. त्याचदरम्यान आज एक माणूस आमच्या हाती लागला. हा हेलिकॉप्टर खरेदी-विक्रीच्या दलालीचे काम करत होता. भारतातील नामदारांच्या मित्रांची बडदास्त ठेवायचा. आज तुम्ही वाचलंच असेल की भारत सरकारने त्याला दुबई येथून अटक केली आहे. हा दलाल आता अनेक गौप्यस्फोट करणार आहे. कुणास ठावूक हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचतेय ते.''
PM Modi in Sumerpur: Helicopter kaand ke raazdar aur dalal ko sarkar Dubai se pakad ke layi hai. Ab raazdar raaz kholega, pata nahi baat kahan tak jayegi, kitni duur tak jayegi #RajasthanElection2018#AgustaWestlandpic.twitter.com/UDqEG5ldm9
— ANI (@ANI) December 5, 2018
यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. ''काँग्रेसच्या काळात लुटालुटीचा खेळ सुरू होता. त्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय घेतला आहे. मात्र ती बातमी वृत्तपत्रातील एका कोपऱ्यात आली आहे. खरंतर ती मुख्य बातमी असायला हवी होती.'' असेही मोदी म्हणाले.
#WATCH PM Modi in Sumerpur: Yesterday we won in Supreme Court, the court said Indian Govt has the right to reasses their(Sonia and Rahul Gandhi) income tax returns. Ab dekhta hoon kaise bach ke nikalte ho #RajasthanElectionspic.twitter.com/PwmgVJh0GM
— ANI (@ANI) December 5, 2018