कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक : AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 08:22 AM2021-04-05T08:22:55+5:302021-04-05T08:25:01+5:30

Coronavirus : देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद, महाराष्ट्रातही आढळले सर्वाधिक रुग्ण

micro lockdown critical to prevent increasing cases of coronavirus aiims chief randeep guleria | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक : AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन आवश्यक : AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया

Next
ठळक मुद्देदेशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंदमहाराष्ट्रातही आढळले सर्वाधिक रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचं मत एम्सचे प्रमुख आणि कोविड टास्कफोर्सचे महत्त्वाचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं. देशात कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येला आळा घालणं आणि सुरक्षेच्या सूचनांचं पालन करण्यासाठी नव्या रणनितीची आवश्यकता आहे. जेणेकरून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर नियंत्रण मिळवता येईल, असा सल्ला त्यांनी रविवारी दिला. 

"देशात कम्युनिटी ट्रान्समिशन होण्याची शक्यता आहे. तसंच जोपर्यंत यावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर ताण कायम राहिल. यासाठी मायक्रो लॉकडाऊन हा एक पर्याय आहे, जो कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यापासून मदत करू शकतो. आपल्याला जलदगतीनं रोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी करावी लागेल. यामध्ये कन्टेन्मेंट झोन, लॉकडाऊन एरिया, चाचण्यांची संख्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन अशा पर्यायांचा वापर केला पाहिजे," असं गुलेरिया म्हणाले. 

अर्थव्यवस्थेला फटका न बसणारी पावलं उचलावी

"आपण अशी पावलं उचलू शकतो ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार नाही. यामध्ये अनावश्यक प्रवासाला टाळलं पाहिजे. तसंच लोकांनी निश्चितच्या सुट्टीच्या कालावधीत बाहेर जाणं टाळलं पाहिजे. यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गावर अंकुश लावण्यास मदत मिळेल. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला नाही अशा ठिकाणीही लक्ष देण्यास यामुळे मदत मिळेल," असं ते म्हणाले.

हा एक मोठा बदल आहे, आम्ही केवळ हवाई प्रवासाबद्दलच बोलत नाही तर रस्ते आणि गाड्यांच्या हालचालींबद्दलही बोलत आहोत. परंतु जेव्हा आपण त्यास संपूर्णतेकडे पहाल तेव्हा आपल्याला हे समजेल की ते किती अवघड आहे. जीनोम सिक्वेंन्सिंग आणि त्याच्या महासाथीच्या डेटाच्या जोडणीसाठी हे महत्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Web Title: micro lockdown critical to prevent increasing cases of coronavirus aiims chief randeep guleria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.