साथीच्या रोगांवर मायक्रो प्लानिंगचा उतारा साथरोग नियंत्रण कार्यशाळा : * प्रभावी उपाययोजना राबविण्याचा सयुक्त संकल्प

By admin | Published: December 20, 2014 10:28 PM2014-12-20T22:28:19+5:302014-12-20T22:28:19+5:30

पनवेल : पनवेल तालुका आणि शहरात अगामी काळात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता मायक्रो प्लॅनिंग करण्याचा संकल्प शनिवारी पार पडलेल्या साथरोग नियंत्रण कार्यशाळेत करण्यात आला. याकरिता सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी एकत्रित येण्याचा निर्धार करण्यात आला.

Micro Planning Vaccine Appropriate Control Workshop on Epidemic Diseases: * Proposal to Implement Effective Measures | साथीच्या रोगांवर मायक्रो प्लानिंगचा उतारा साथरोग नियंत्रण कार्यशाळा : * प्रभावी उपाययोजना राबविण्याचा सयुक्त संकल्प

साथीच्या रोगांवर मायक्रो प्लानिंगचा उतारा साथरोग नियंत्रण कार्यशाळा : * प्रभावी उपाययोजना राबविण्याचा सयुक्त संकल्प

Next
वेल : पनवेल तालुका आणि शहरात अगामी काळात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता मायक्रो प्लॅनिंग करण्याचा संकल्प शनिवारी पार पडलेल्या साथरोग नियंत्रण कार्यशाळेत करण्यात आला. याकरिता सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी एकत्रित येण्याचा निर्धार करण्यात आला.
गेल्या दोन तीन महिन्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर शहरात डेंग्यूने अनेकांचा बळी गेला. डेंग्युची एक प्रकारे दहशत पसरली आहे. सिडको वसाहतीतील खारघर, कामोठे, कळंबोली आणि नवीन पनवेल परिसरता डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले. पनवेल तालुक्यात गेल्या वर्षभरात शासकीय माहितीनुसार १३२ डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले. त्यापैकी चार जणांना लागण झाली. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी आदेश दिल्यानंतर पनवेल शहर आणि तालुक्यात घरोघरी सर्व्हे करण्यात आला. घरातील फुलदाण्या, ड्रम, टाक्या, कुंड्या, शोपिस, प्लास्टिक, फ्रिजरची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर प्रशिक्षित पथक तयार करुन त्यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात आली.
डेंग्यूकरिता पॅराथाम लिक्विडची फवारणी करुन अळ्या मारण्यात आल्या. या व्यतिरिक्त पत्रक, बॅनर्स लावून पनवेलकरांमध्ये जागृती करण्यात आली. त्याचबरोबर डासप्रतिबंधात्मक फवारणीही आरोग्य विभाग करीत आहे, असे असले तरी अगामी काळात डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचेच पूर्णत: उच्चाटन करण्याकरिता प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी फडके नाट्यगृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत, पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील, प्रांताधिकारी सुदाम परदेशी, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, पंचायत समितीचे सदस्य निलेश पाटील, अनिल भगत, डॉ. गिरीश गुणे यांच्यासह शासकीय अधिकारी, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला परिसर स्वच्छ राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्याचे पालन झाल्यास स्वच्छता या ठिकाणी आपोआप वास करेल मत आ. ठाकूर यांनी व्यक्त केले. एखादा रोग झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्याकरिता धावपळ करण्यापेक्षा तो होणारच नाही या करिता खबरदारी घेणे कधीही उत्तम असल्याचेही ते म्हणाले. पनवेलकरांनी एकत्रितरित्या प्रयत्न केल्यास डेंग्यू आणि मलेरिया या परिसरातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. सुदाम परदेशी, चारुशीला पंडित व गिरीश गुणे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)
------------
चौकट
शहर व ग्रामीण कमिटी स्थापना होणार
साथीचे रोगावर नियंत्रण ठेवण्याकरिता लवकरच शहरी आणि ग्रामीण कमिट्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या कमिटीच्या नियमीत बैठका होऊन रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना होतात की नाही यावर लक्ष्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर याकरिता विविध उपाययोजनाही सूचविण्याच्या अधिकार त्यांनी असणार आहे.

तालुक्यात विविध उपक्रम
डेंग्यू व मलेरियासारखे किटकजन्य आजार होऊ नये याकरिता तालुका प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी इटकरे यांनी सांगितले. ग्रामसभा, कोरडा दिवस, हस्तपत्रिका वाटप, स्वच्छता मोहिम, व्हेंट पाईपवर जाळ्या, आळी नाशकाचा वापर, गप्पी मासे सोडणे, आरोग्यविषयक जनजागृती, विभागातील खाजगी डॉक्टरांच्या भेटी, विद्यार्थ्यांच्या प्रभातफेर्‍या आदी विविध कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.

----
फोटो आहे 20 पनवेल

Web Title: Micro Planning Vaccine Appropriate Control Workshop on Epidemic Diseases: * Proposal to Implement Effective Measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.