Microsoft Windows Outage मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड, जगभरात बँकांपासून विमानसेवेपर्यंत अनेक सेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 01:18 PM2024-07-19T13:18:37+5:302024-07-19T14:05:53+5:30
Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे.
Microsoft Windows Outage - मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. जगभरामध्ये विंडो सिस्टिमवर ब्ल्यू स्क्रिनचा एरर दिसत आहे. दरम्यान, कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बहुतांश विंडोड युझर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर दिसत आहे. ही अडचण हल्लीच्या क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे. या अडचणीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत.
दरम्यान, या बिघाडाचा फटका भारतातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे. मुंबई विमानतळ आणि गोवा विमातळावर सर्व्ह ठप्प झाल्याची बातमी आली आहे. तसेच मुंबई विमानतळावर चेक इन सिस्टिम ठप्प झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आकासा एअरने सेवा ठप्प झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्पाइसजेड आणि इंडिगेकडूनही अशी तांत्रिक अडचण येत असल्याचे म्हटले आहे. सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म क्राऊडस्ट्राइकमध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे सेवा बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बहुतांश युझर्स याबाबत तक्रार करत आहेत. या अडचणीमुळे लाखो युझर्सना फटका बसला आहे. अनेक युझर्स त्यांच्याकडे सिस्टिम शटडाऊन झाल्याची किंवा त्यांना ब्लू स्क्रीनची अडचण येत असल्याची तक्रार करत आहे. याचा फटका मुख्य बँका, इंटरनॅशनल एअरलाइन्स, जीमेल, अॅमेझॉन आणि इतर अत्यावश्यक सेवांना फटका बसला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्येही बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आऊटलेट आणि एअरलाइन्सची सेवा प्रभावित झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर यांनी सांगितले की, देशात शुक्रवारी दुपारी मोठ्या प्रमाणावार कंपन्यांच्या सेवा प्रभावित झाल्या आहेत.