मध्यावधी झाल्यास रजनीकांत यांच्या पक्षाला ३३ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:49 AM2018-01-18T02:49:14+5:302018-01-18T02:50:03+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागा लढविण्याची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांत उत्साह असला
चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागा लढविण्याची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांत उत्साह असला, तरी तामिळनाडूत लगेच निवडणूक झाल्यास, त्यांना केवळ १६ टक्के मिळतील, असे सर्व्हेतून समोर आले आहे.
‘इंडिया टुडे-कार्वी’च्या सर्वेक्षणानुसार द्रमुकचे पारडे असेल. रजनीकांत यांच्या पक्षाला फक्त ३३ जागा मिळतील. मे २०११ पासून विरोधी पक्ष असलेल्या द्रमुक आणि मित्र पक्षांसाठी मध्यावधी निवडणूक फायदेशीर ठरेल. रजनीकांत यांच्या पक्षापेक्षा द्रमुकला (डीएमके) दुपटीने म्हणजे ३४ टक्के मते मिळतील.
मुख्यमंत्री म्हणून द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना ५० टक्के लोकांनी पसंती दिली असून, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रजनीकांत १७ टक्के लोकांच्या पाठिंब्यासह दुसºया क्रमांकावर आहेत. उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्री म्हणून ११ टक्के लोकांनी पाठिंबा दिला असून, विद्यमान मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी फक्त ५ टक्के लोकांचाच पाठिंबा मिळाला आहे.