उत्तराखंडात मध्यावधीची पडताळणी
By admin | Published: May 12, 2016 03:58 AM2016-05-12T03:58:07+5:302016-05-12T03:58:07+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट संपून हरीश रावत मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार असले तरी हे सरकार फार काळ चालविण्याची त्यांची इच्छा नाही.
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट संपून हरीश रावत मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार असले तरी हे सरकार फार काळ चालविण्याची त्यांची इच्छा नाही.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष नेतृत्वाने रावत यांना लवकरात लवकर विधानसभा विसर्जित करून निवडणूक घेण्याची शक्यता पडताळून बघण्याचा सल्ला दिला आहे. कारण बंडखोर आमदारांबाबत अंतिम निर्णय अद्याप यायचा आहे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेण्याचीही सूचना रावत यांना करण्यात आली आहे. जाणकारांच्या मते रावत यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला तरीही निवडणूक होईपर्यत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साह आहे. कपिल सिब्बल यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली.