कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार, दीड लाखांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 08:33 AM2020-09-03T08:33:29+5:302020-09-03T08:33:40+5:30

वर्षाच्या अखेरीस 20,000 शिक्षकांची भरती करण्याची त्यांची योजना आहे, अर्थात यावर्षी आणखी 13,000 शिक्षकांची भरती करण्याची कंपनीचा मानस आहे. 

midst of the coronavirus crisis this edtech company would provide jobs to 20 thousand women | कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार, दीड लाखांपर्यंत पगार

कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार, दीड लाखांपर्यंत पगार

googlenewsNext

कोरोना संकटाच्या काळात पदवीधर आणि पदव्युत्तर महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. एडटेक स्टार्टअप व्हाइटहॅट जुनियर (WhiteHat Jr)ने म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील महिला शिक्षकांची संख्या वाढवित आहेत. कंपनी प्लॅटफॉर्मवर दररोज 220 शिक्षकांना जोडत आहे. आतापर्यंत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7,000 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहे. वर्षाच्या अखेरीस 20,000 शिक्षकांची भरती करण्याची त्यांची योजना आहे, अर्थात यावर्षी आणखी 13,000 शिक्षकांची भरती करण्याची कंपनीचा मानस आहे. 

अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढतीच
व्हाइटहॅट जुनियरला अलीकडेच बीजू(Byju's) यांनी विकत घेतले होते. व्हाइटहॅट ज्युनियर म्हणाले की, त्यांचे भारत (India), अमेरिका (US), कॅनडा (Canada), ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, त्याच्या प्लॅटफॉर्मवर  शिक्षकांची संख्या वाढत आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे डिजिटल शिक्षण आणि शिक्षणाच्या पद्धतींमध्ये नवीन प्रयोग करण्यात येत आहेत.

पालक ऑनलाइन शिकण्यास पूर्णपणे पाठिंबा देत आहेत
व्हाइटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज म्हणाले की, पालकांनीही ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. मुलांच्या शिक्षणाच्या या नवीन दृष्टिकोनास पालक पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित 84 टक्के शिक्षकांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. ते घरी मुलांना शिकवत आहेत आणि दरमहा सरासरी 50,000 ते 1.5 लाख रुपये कमवत आहेत. बहुतेक शिक्षकांकडे पदव्युत्तर पदवी आहेत. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली होती.

Web Title: midst of the coronavirus crisis this edtech company would provide jobs to 20 thousand women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.