हिमाचल प्रदेशात हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले, पायलट बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 02:42 PM2018-07-18T14:42:27+5:302018-07-18T14:55:28+5:30
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळल्याची घटना बुधवारी घडली.
कांगडा : हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळल्याची घटना बुधवारी घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कांगडा जिल्ह्यातील जवाली भागात भारतीय हवाई दलाचे मिग 21 लढाऊ विमान कोसळले. भारतीय हवाई दलाचे हे विमान पंजाबच्या पठाणकोटहून निघाले होते. विमानाचा पायलट बेपत्ता असून त्याचा शोघ घेणे सुरू आहे. घटनास्थळी बचाव पथकाने मदत कार्य सुरू केले आहे.
MiG-21 Indian aircraft coming from Punjab's Pathankot crashes in Patta Jattiyan in Jawali subdivision of Himachal Pradesh's Kangra district. Pilot is missing. Rescue team on the way. More details awaited pic.twitter.com/093Psw4HEj
— ANI (@ANI) July 18, 2018
दरम्यान, एकीकडे विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समजल्यानंतर पायलट विमान अपघात होण्याआधीच पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
#SpotVisuals: MiG-21 Indian aircraft coming from Punjab's Pathankot has crashed in Patta Jattiyan in Jawali subdivision of Himachal Pradesh's Kangra district. Pilot is missing pic.twitter.com/C9Ih9Q0hU2
— ANI (@ANI) July 18, 2018