गोव्यात नौदलाचे लढाऊ Mig-29k विमान कोसळले; वैमानिक सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 01:02 PM2022-10-12T13:02:47+5:302022-10-12T13:14:55+5:30

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे Mig-29k हे लढाऊ विमान उड्डाणादरम्यान कोसळले. या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्यामुळे कोसळले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

MiG 29K fighter aircraft crashes off Goa coast in Panaji | गोव्यात नौदलाचे लढाऊ Mig-29k विमान कोसळले; वैमानिक सुखरुप

गोव्यात नौदलाचे लढाऊ Mig-29k विमान कोसळले; वैमानिक सुखरुप

Next

पणजी: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदलाचे Mig-29k हे लढाऊ विमान उड्डाणादरम्यान कोसळले. या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्यामुळे कोसळले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या विमानातील वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. 

या प्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नियमित उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. या अपघातातील वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे का? मग 'हे' काम लवकर करा, अन्यथा...

हे विमान गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. यात वैमानिकाला कोणतीही इजा झालेली नाही. २००४ आणि २०१० मध्ये भारताने रशियाकडून एकूण ४५ MiG-29K खरेदी केली. २३ जून २०११ रोजी एक रशियन मिग-29K ट्रेनर विमान क्रॅश होऊन दोन्ही वैमानिक ठार झाले होते. त्यानंतरच या विमानाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होऊ लागले होते.

Web Title: MiG 29K fighter aircraft crashes off Goa coast in Panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.