मिग -29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळले; दोनपैकी एक पायलट बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 09:31 AM2020-11-27T09:31:01+5:302020-11-27T09:31:28+5:30

MiG-29K Crash : गेल्या वर्षभरातील मिग -29K विमानाला झालेला हा तिसरा अपघात आहे.

MiG-29K training aircraft crashes in Arabian Sea; One of the two pilots went missing | मिग -29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळले; दोनपैकी एक पायलट बेपत्ता

मिग -29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळले; दोनपैकी एक पायलट बेपत्ता

googlenewsNext

भारतीय नौदलाचे मिग -29K प्रशिक्षण विमान गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास अरबी समुद्रात कोसळले. यामध्ये एका पायलटला वाचविण्यात यश आले असून दुसरा पायलट बेपत्ता आहे. या पायलटला शोधण्याची मोहिम सुरु आहे. 




गेल्या वर्षभरातील मिग -29K विमानाला झालेला हा तिसरा अपघात आहे. नौदलाने या अपघाताची माहिती देताना सांगितले की, 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मिग-29के हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान समुद्रात अपघातग्रस्त झाले. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Web Title: MiG-29K training aircraft crashes in Arabian Sea; One of the two pilots went missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.