मोदींच्या पॅकेजमधल्या काही घोषणा चांगल्या, पण...; 'आत्मनिर्भर'वर पहिल्यांदाच बोलले रघुराम राजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 09:50 PM2020-05-21T21:50:38+5:302020-05-21T21:53:12+5:30

आत्मनिर्भर भारत पॅकेजमधील घोषणांवर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं भाष्य

Migrant Workers Need Money With Free Foodgrains Says Raghuram Rajan kkg | मोदींच्या पॅकेजमधल्या काही घोषणा चांगल्या, पण...; 'आत्मनिर्भर'वर पहिल्यांदाच बोलले रघुराम राजन 

मोदींच्या पॅकेजमधल्या काही घोषणा चांगल्या, पण...; 'आत्मनिर्भर'वर पहिल्यांदाच बोलले रघुराम राजन 

googlenewsNext

नवी दिल्ली: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात २० लाख कोटी रुपयांचं आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केलं. मात्र हे पॅकेज अपुरं असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. सरकारनं प्रवासी मजुरांना मोफत डाळ आणि धान्य देण्याची घोषणा केली आहे. पण दूध, भाजी, तेल आणि घरभाड्यासाठी मजुरांना पैशांची गरज असल्याचं राजन म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी कोरोनाचं संकट, त्याचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि मोदी सरकारनं जाहीर केलेलं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज यावर भाष्य केलं. 'कोरोना संकट येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीत होती. विकास दरात सातत्यानं घसरण सुरू होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. २० लाख कोटींच्या पॅकेजमधून काही चांगल्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र सध्याच्या घडीला त्यापेक्षा बरंच काही करणं गरजेचं आहे,' असं राजन म्हणाले.  

देशाच्या अर्थव्यवस्थेला काही ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. काही बँका, मोठ्या कंपन्या, लघु सूक्ष्म मध्यम क्षेत्रांमध्ये (एमएसएमई) बदलांची गरज आहे. मोदींनी केलेल्या घोषणांमुळे काही क्षेत्रांमध्ये आवश्यक दुरुस्ती होईल. मात्र काही क्षेत्रांमध्ये पूर्णपणे धोरणात्मक बदल गरजेचे आहेत, असं राजन यांनी म्हटलं.

आत्मनिर्भर पॅकेजमध्ये अर्थव्यवस्थेशी संबंधित फारशा मोठ्या घोषणा नाहीत. प्रवासी मजुरांसाठी केलेल्या तरतुदीदेखील अपुऱ्या आहेत. त्यांना मोफत धान्य आणि डाळ दिली जाणार आहे. मात्र यासोबतच त्यांच्या हाती पैसा जायला हवा होता. मात्र तशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असं मत राजन यांनी व्यक्त केलं. 

ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणार

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

सीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथ

पीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखल

तिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

Web Title: Migrant Workers Need Money With Free Foodgrains Says Raghuram Rajan kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.