मागणीअभावी सोन्याच्या भावात किरकोळ घसरण
By admin | Published: September 2, 2014 03:05 AM2014-09-02T03:05:41+5:302014-09-02T03:05:41+5:30
व्यापा:यांच्या मागणीत घट झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याचा भाव 9क् रुपयांच्या घसरणीसह प्रति दहा ग्रॅम 28,175 रुपये झाला.
Next
नवी दिल्ली : व्यापा:यांच्या मागणीत घट झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याचा भाव 9क् रुपयांच्या घसरणीसह प्रति दहा ग्रॅम 28,175 रुपये झाला. तथापि, औद्योगिक संस्थांच्या मागणीने चांदीचा भाव 25 रुपयांच्या अल्प वाढीसह 42,8क्क् रुपये प्रतिकिलो राहिला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, अमेरिकेत आज कामगार दिवस असल्याने सराफा बाजार बंद होता. कोणतेही संकेत न मिळाल्याने बाजारात हा कल दिसून आला. दुसरीकडे समभाग बाजारातील उच्चंकी घोडदौडीचा सराफ्यातील गुंतवणुकीवर परिणाम झाला.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 9क् रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 28,175 रुपये व 27,975 रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. यात शनिवारच्या व्यवहाराच्या तुलनेत 35 रुपयांची घसरण झाली. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,6क्क् रुपयांवर कायम राहिला.
दुसरीकडे तयार चांदीचा भाव 25 रुपयांनी वाढून 42,8क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 9क् रुपयांच्या तेजीसह 42,14क् रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता 74,क्क्क् रुपये व विक्रीसाठी 75,क्क्क् रुपये प्रतिशेकडय़ावर कायम
राहिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)