लष्कराला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:07 PM2019-05-24T13:07:29+5:302019-05-24T13:23:06+5:30

जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला आहे.

militant commander zakir musa killed in tral encounter jammu and kashmir | लष्कराला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा

लष्कराला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा

Next
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील त्राल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी (23 मे) शोधमोहीम राबवण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला झाकीर मुसाचा खात्मा करण्यात यश आले आहे. शुक्रवारी सकाळी मुसाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तसेच त्याच्यासोबत कमांडर अन्सार याचा देखील खात्मा करण्यात आला आहे. 

झाकीर मुसा याचं खरं नाव झाकीर राशिद भाट असं आहे. 2013 मध्ये पंजाबमधील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना तो हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. जुलै 2017 मध्ये हिजबुलचा कमांडर बुरहान वाणी याचा खात्मा झाल्यानंतर मुसा हा हिजबूलचा जम्मू काश्मीरमधील टॉपचा कमांडर झाला होता. त्यानंतर त्याने गझावत उल हिंद ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती.


जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला याआधी काही दिवसांपूर्वी श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली होती. अब्दुल मजीद बाबा असं दहशतवाद्याचं नाव असून त्याच्यावर तब्बल 2 लाखांचं बक्षिस होतं. अब्दुल मजीद बाबा याला श्रीनगरमधून अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. अब्दुल हा जम्मू-काश्मीरच्या मागरेपोरा येथील रहिवासी असून त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला अब्दुलविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली होती. 2007 मध्ये दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. तेव्हापासून अब्दुल मजीद बाबा हा फरार होता. पोलिसांनी या चकमकीनंतर तिघांना अटक केली होती. 2015 मध्ये उच्च न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच फरार झालेल्या अब्दुल विरोधात उच्च न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. 

जैश-ए-मोहम्मदच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला जैशच्या दहशतवाद्याला पकडण्यात यश आले होते. दिल्ली पोलिसांनी फैय्याज अहमद लोनवर दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते. फैय्याज 2015 पासून फरार असून त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. तसेच त्याआधी काही दिवसांपूर्वीच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर व पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर अहमदचा साथीदार सज्जाद खानला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा पथकं आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे.

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (3 मे) चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तर एक जवान जखमी झाला होता. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू होती. एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले. शोपियानमधील चकमकीनंतर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा ही काही काळासाठी बंद करण्यात आली होती. 

 

Web Title: militant commander zakir musa killed in tral encounter jammu and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.