जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी शहीद तर एक CRPF जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 04:18 PM2022-10-02T16:18:06+5:302022-10-02T16:20:18+5:30
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनाकडून आगळीक सुरूच आहे. दहशतवाद्यांकडून खोऱ्यातील लष्कर आणि नागरिकांना सातत्यानं लक्ष्य करण्यात येत आहे.
पुलवामा
जम्मू-काश्मीरमधीलदहशतवादी संघटनाकडून आगळीक सुरूच आहे. दहशतवाद्यांकडून खोऱ्यातील लष्कर आणि नागरिकांना सातत्यानं लक्ष्य करण्यात येत आहे. पुलवामामधील पिंगलाना परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य केलं आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला तर एक CRPF जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामाच्या पिंगलना येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त दलावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून एक CRPF जवान जखमी झाला आहे. अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात येत आहे.
Terrorists fired upon joint party of CRPF & Police at Pinglana, Pulwama. In this terror attack, one Police personnel got martyred & one CRPF personnel got injured. Reinforcement sent. Area being cordoned: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) October 2, 2022
ओमर अब्दुल्ला यांनी केला घटनेचा निषेध
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी घटनेचा निषेध केला आहे. यासोबतच त्यांनी पोलीस कर्मचार्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "या हल्ल्याचा निषेध करत मी आज कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी सीआरपीएफ जवान लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतो"
While condemning this attack I send my condolences to the family of the J&K police personnel who laid down his life in the line of duty today. I also send my best wishes for the speedy recovery of the injured CRPF personnel. https://t.co/EeqSlSp65P
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 2, 2022
शोपियानमध्ये दहशतवादी मारला गेला
याआधी आज जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला. शोपियांच्या नौपोरा भागातील नसीर अहमद भट असे या दहशतवाद्याचे नाव आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील बास्कुचन भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. याआधीही सुरक्षा दलाच्या डोळ्यात धूळ फेकून हा दहशतवादी फरार झाला होता. सुरक्षा दल परिसरात शोध घेत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सैन्यानं प्रत्युत्तर दिलं आणि चकमक झाली, ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा एक स्थानिक दहशतवादी मारला गेला, असे अधिकाऱ्यानं सांगितलं.