अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने फेकले ग्रेनेड, श्रीनगरमधील घटनेत मुलगा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:08 AM2020-01-05T06:08:36+5:302020-01-05T06:08:50+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या कवदारा भागात संशयित अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर शनिवारी एक ग्रेनेड फेकले.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या कवदारा भागात संशयित अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर शनिवारी एक ग्रेनेड फेकले. यात १६ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांनी आपल्या लक्ष्यापर्यंत फेकलेले ग्रेनेड त्या ठिकाणापर्यंत पोहोचले नाही आणि रस्त्याच्या बाजूला त्याचा स्फोट झाला. यात सीआरपीएफच्या जवानांना कोणतीही इजा झाली नाही. याचवेळी रस्त्यावरून जाणाºया एका मुलाला छर्रे लागल्याने तो किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर लोकांमध्ये भीती पसरली आहे.
या घटनेत दोन खासगी वाहनांचे नुकसान झाले आहे. या मुलाला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतर तात्काळ या भागाची नाकाबंदी करण्यात आली. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
‘लष्कर’चा अतिरेकी पकडला
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एका हॉस्पिटलमधून लष्कर-ए-तोयबाच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली.
एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, काश्मीर पोलिसांच्या स्पेशल आॅपरेशन्स ग्रुपने उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन भागातील निवासी निसार अहमद डार याला शहराच्या श्री महाराजा हरीसिंह हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली.
डार याचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध होते.