अमेरिकेतून लष्कराचं विमान पुन्हा येणार; आणखी ४८७ भारतीय नागरिक डिपोर्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:33 IST2025-02-07T18:31:42+5:302025-02-07T18:33:35+5:30

अमेरिकेतून आणखी ४८७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Military plane to arrive from US again 487 more Indian citizens to be deported | अमेरिकेतून लष्कराचं विमान पुन्हा येणार; आणखी ४८७ भारतीय नागरिक डिपोर्ट होणार

अमेरिकेतून लष्कराचं विमान पुन्हा येणार; आणखी ४८७ भारतीय नागरिक डिपोर्ट होणार

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून अॅक्शनमोडवर आले आहे. अवैध मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात ट्रम्प यांनी कारवाई सुरु केली आहे, दोन दिवसापूर्वी अमेरिकेच्या लष्कराच्या विमानाने १०४ अवैध मार्गाने घुसखोरी करणाऱ्या भारतीयांना अमृतसर विमानतळावर सोडले, यावरुन काल संसदेतही गोंधळ झाला. आता आणखी एक अपडेट समोर आली आहे, अमेरिकून आणखी ४८७ भारतीयांना डिपोर्ट करण्यात येणार आहे.  यावर आता परराष्ट्र खात्याने चिंता व्यक्त केली आहे.

नवशिक्या चालकाने शंभरच्या स्पीडने कार चालवली; ६ जण गंभीर, अनेकजण जखमी

केंद्र सरकारने सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांनी तेथे राहणाऱ्या आणखी ४८७ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली आहे आणि त्यांना लवकरच भारतात परत पाठवले जाणार आहे. दरम्यान, भारताने भारतीयांना हद्दपार केल्या जाणाऱ्या गैरवर्तनाच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या हद्दपारीबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी  अमेरिकन अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर बद्दल माहिती दिली आहे. 

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, हद्दपारीची प्रक्रिया नवीन नाही. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काल संसदेत या मुद्द्यावर चर्चा केली होती. जर जगातील कोणत्याही देशाला आपल्या नागरिकांना परत स्वीकारायचे असेल, तर त्यांना खात्री असणे आवश्यक आहे की, जो कोणी परत येत आहे तो भारताचा नागरिक आहे, यात वैधता आणि सुरक्षिततेचे प्रश्न आहेत. 

विक्रम मिस्री म्हणाले की, परराष्ट्रमंत्र्यांनी ही प्रक्रिया बऱ्याच काळापासून सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. निर्वासित स्थलांतरितांवरील गैरवर्तनाचा मुद्दा गंभीर आहे, हा मुद्दा आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे.

अमेरिकेने भारताला ४८७ लोकांची माहिती दिली

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अमेरिकेने भारताला ४८७ संभाव्य भारतीय नागरिकांबद्दल माहिती दिली आहे. त्यांना हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आम्ही अमेरिकन प्रशासनाला स्पष्ट केले आहे की, निर्वासित भारतीयांशी कोणतेही अमानुष वर्तन सहन केले जाणार नाही. जर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाची माहिती मिळाली तर आम्ही ते ताबडतोब उच्च पातळीवर उपस्थित करू.

अलिकडच्याच एका संभाषणात जेव्हा आम्ही अमेरिकेतून परत येणाऱ्या संभाव्य लोकांबद्दल तपशील विचारला. आम्हाला सांगण्यात आले आहे की ४८७ भारतीय नागरिकांसाठी अंतिम हद्दपारीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी लष्करी विमानांच्या वापराबद्दल ते म्हणाले की, कालच्या आदल्या दिवशी झालेली हद्दपारी ही अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रक्रियेपेक्षा वेगळी होती आणि ती थोड्या वेगळ्या स्वरूपाची होती.

Web Title: Military plane to arrive from US again 487 more Indian citizens to be deported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.