संघ, संघटना आणि योगी, भाजपाने असा भेदला समाजवादी पार्टीचा मिल्कीपूरचा गड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:14 IST2025-02-09T12:14:19+5:302025-02-09T12:14:58+5:30

Milkipur By Election Result 2025 :

Milkipur By Election Result 2025 : RSS, organizations and Yogi Adityanath, this is how BJP broke Samajwadi Party's stronghold of Milkipur | संघ, संघटना आणि योगी, भाजपाने असा भेदला समाजवादी पार्टीचा मिल्कीपूरचा गड 

संघ, संघटना आणि योगी, भाजपाने असा भेदला समाजवादी पार्टीचा मिल्कीपूरचा गड 

उत्तर प्रदेशमधील अयोध्या जिल्ह्यातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. त्याबरोबरच भाजपाने २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येमध्ये समाजवादी पार्टीकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. येथे भाजपाचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी अयोध्या-फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांचा दारुण पराभव केला. चंद्रभानू पासवान हे आथा मिल्कीपूरचे नवे आमदार बनले आहेत. आता भाजपाच्या या विजयाचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाची संघटना आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रणनीती यांना दिलं जात आहे.

मिल्कीपूरमध्ये भाजपाला मिळालेल्या या विजयाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एखादी गोष्ट एकदा ठरवतात, ते पूर्ण करून दाखवतात, हे सिद्ध केलं आहे.  मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातीन निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे येथील निवडणुकीची सर्व सुत्रे योगींनी आपल्या हाती घेतली. तसेच ही निवडणूक स्वत:साठी आणि पक्षासाठी प्रतिष्ठेची करून अखेरीस बंपर विजय मिळवला.

भाजपाच्या या विजयामध्ये भगवं हिंदुत्ववादी राजकारण आणि भदरसा येथील बलात्कारकांड महत्त्वाचे मुद्दे ठरले. या मुद्यांवर योगींनी लक्ष्य केंद्रित केले आणि पक्ष संघटनेने हे मुद्दे घरोघरी पोहोचवले. लोकसभा निवडणुकीत फैजाबाद मतदारसंघात झालेला पराभव भाजपासाठी भावनिक मुद्दा बनला होता. तसेच या पराभवावरून अखिलेश यादव यांनी भाजपाविरोधात देशभरात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र योगींनी हा पराभव आव्हान म्हणून स्वीकारत वर्षभराच्या आत अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाला धक्का दिला. दरम्यान, भदरसा सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे समाजवादी पक्षाविरोधात भाजपाला मोठा मुद्दा मिळाला होता. या प्रकरणात सपाचे खासदार अवधेश प्रसाद यांचा निकटवर्तीय मोईद खान आणि त्याचा ड्रायव्हर आरोपी होते. तसेच त्यांनी अतिमागास समाजातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.

मिल्कीपूर निवडणुकीच्या प्रचारामध्ये योगी आदित्यनाथ हे समाजवादी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या मुस्लिमांच्या लांगुलचालनाविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडत होते. त्याचा खूप  मोठा परिणाम झाला. दरम्यान, सपाचे उमेदवार अजित प्रसाद यांच्याविरोधात भाजपाने चंद्रभानू पासवान यांना उमेदवारी दिली. चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पक्षाचा हक्काचा मतदार असलेल्या यादव समाजामधील मतं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले.  यादव समाज मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळत असल्याचे दिसताच समाजवादी पक्षाच्या निवडणूक लढवण्याच्या उतरती कळा लागली. त्यातच भाजपाने नवा चेहरा देऊन घराणेशाहीला वैतागलेल्या मतदारांना नवा पर्याय दिला. त्याचा भाजपाला फायदा झाला.   

Web Title: Milkipur By Election Result 2025 : RSS, organizations and Yogi Adityanath, this is how BJP broke Samajwadi Party's stronghold of Milkipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.