काश्मीरवरून लंडनमध्ये ‘मिलियन मार्च’

By admin | Published: October 19, 2014 02:38 AM2014-10-19T02:38:16+5:302014-10-19T02:38:16+5:30

‘आझाद काश्मीर’चा नारा देण्यासाठी येत्या 26 ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये भारतविरोधी ‘मिलियन मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे.

'Million March' from Kashmir to London | काश्मीरवरून लंडनमध्ये ‘मिलियन मार्च’

काश्मीरवरून लंडनमध्ये ‘मिलियन मार्च’

Next
लंडन : काश्मीरच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कलगीतुरा सुरू असताना आणि काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असताना ‘आझाद काश्मीर’चा नारा देण्यासाठी येत्या 26 ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये भारतविरोधी ‘मिलियन मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीची सुरुवात लंडनच्या मध्यवर्ती ट्रॅफलगार चौकात होईल व काही हजार लोक काश्मीर मुक्तीच्या घोषणा देत मोर्चा घेऊन 1क्      डाऊनिंग स्ट्रीट येथे जातील. तेथे काश्मीरचा गुंता सोडविण्यासाठी भारताकडे आग्रह करावा, असे निवेदन ब्रिटिश पंतप्रधान  डेव्हिड कॅमेरून यांना दिले जाईल.
ज्याला पाकिस्तान ‘आझाद काश्मीर’ म्हणते त्या पाकव्याप्त काश्मीरचे माजी ‘पंतप्रधान’ बॅ. सुलतान मेहमूद चौधरी यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे. काश्मीर प्रश्नाची सोडवणूक आणि भारतीय काश्मीरमध्ये होणारी मानवी हक्कांची उघड पायमल्ली थांबविण्यासाठी भारतावर दबाव आणणो हा या रॅलीचा उद्देश असल्याचे चौधरी यांचे म्हणणो            आहे. ब्रिटनच्या संसद सदस्यांनीही हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस        ऑफ लॉर्ड्समध्ये काश्मीरचा विषय उपस्थित करावा, अशीही त्यांची अपेक्षा आहे.
लंडनमधील या रॅलीनंतर लगेच दुस:या दिवशी युरोपीय समुदायाचे मुख्यालय असलेल्या ब्रुसेल्स शहरातही अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले.
सध्या ब्रिटनच्या दौ:यावर असलेल्या भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रस्तावित रॅलीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून ब्रिटनने अशा भारतविरोधी भावनांना चिथावणी देण्यास मुभा देता कामा नये, अशी अपेक्षा यजमान परराष्ट्रमंत्री फिलिप हॅमण्ड यांच्यासोबतच्या बैठकीत व्यक्त केली. नंतर ब्रिटनचे उपपंतप्रधान निक क्लेग यांच्याशी झालेल्या चर्चेतही स्वराज यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
ब्रिटनमधील भारतीय उच्चयोगानेही याआधी अशा रॅलीला परवानगी न देण्याची मागणी ब्रिटन सरकारकडे केली होती.                   
भारतीय परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते सैयद अकबरुद्दीन यांनी स्वराज व हॅमण्ड यांच्या भेटीनंतर सांगितले की, काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी भारत व पाकिस्तान यांच्यात अलीकडेच झालेल्या प्रयत्नांची माहिती ब्रिटनला देण्यात आली आहे. यात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्याचा आपला कोणताही इरादा नाही व हा गुंता भारत व पाकिस्तान या उभय देशांनी द्विपक्षीय चर्चेतून सोडवायचा आहे, अशी आपली नि:संदिग्ध भूमिका असल्याचे ब्रिटनने स्पष्ट केल्याचेही अकबरुद्दीन   म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
4काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीच्या दीक्षांत समारंभात बोलताना जनरल शरीफ म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांनुसार काश्मीरच्या नागरिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळायला हवा. क्षेत्रिय स्थैर्य व समानता आणि परस्पर सन्मानावर आधारित संबंध प्रस्थापित व्हावेत, अशी पाकिस्तानची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.
 
4शांततेचा निरंतर पाठपुरावा हेच पाकिस्तानचे सर्वात मोठे बलस्थान आहे, असा दावा करतानाच त्यांनी असाहा इशारा दिला की, कोणत्याही बाह्य धोक्याचा मुकाबला करण्यास पाकिस्तानची सशस्त्र सेनादले सदैव सक्षम आहेत व कोणत्याही आक्रमणाला ‘मुँहतोड जवाब’ दिला जाईल.
 

 

Web Title: 'Million March' from Kashmir to London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.