कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखोंनी फसविले

By admin | Published: September 27, 2014 11:18 PM2014-09-27T23:18:10+5:302014-09-27T23:18:10+5:30

लघु उद्योगासाठी ६० ते ७० टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध असल्याचे सांगून सदर कर्ज घेण्यासाठी रेखेगाव परिसरातील जवळपास ५० ते ६० नागरिकांकडून प्रत्येकी ४० ते ५० हजार रूपये घेऊन सुरज अनिल भांडेकर

Millions are tricked by showing lenders to lend | कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखोंनी फसविले

कर्ज देण्याचे आमिष दाखवून लाखोंनी फसविले

Next

गडचिरोली : लघु उद्योगासाठी ६० ते ७० टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध असल्याचे सांगून सदर कर्ज घेण्यासाठी रेखेगाव परिसरातील जवळपास ५० ते ६० नागरिकांकडून प्रत्येकी ४० ते ५० हजार रूपये घेऊन सुरज अनिल भांडेकर व संजय सदाशिव कोटांगले यांनी फसवणुक केली असल्याचा आरोप पांडुरंग भांडेकर व इतरांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
सुरज अनिल भांडेकर व संजय सदाशिव कोटांगले हे दोघेही रेखेगाव परिसरातील गावांमध्ये डिसेंबर २०१३ या कालावधीत फिरून आपण महाराष्ट्र शासन लघु उद्योग महामंडळ मुंबई- ३२ चे माहिती अधिकारी आहोत. या मंडळाच्यावतीने गरजू नागरिकांना ६० ते ७० टक्के सुटीवर कर्ज उपलब्ध करून देऊ असे सांगितले. यापैकी संजय कोटांगले हा गोकुळनगर, गडचिरोली येथील रहिवासी आहे. त्याच्यावर नागरिकांचा विश्वास नव्हता मात्र सुरज अनिल भांडेकर हा परिसरातीलच गिलगाव येथील नागरिक असल्याने नागरिकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यांनी नागरिकांना सातबारा, नमुना-८, पॅन कार्ड, पोस्टाचे बचत खाते, स्टेट बँक आॅफ इंडियाचे बचत खाते काढायला लावले. कर्ज मंजूर करण्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून १५ हजार ते ४० हजार रूपये रक्कम जमा केली. २ महिन्यानंतर कर्ज मंजूर झाले असल्याचे सांगून चेक व्हेरिफीकेशन चार्ज म्हणून प्रत्येकाकडून आणखी ८ हजार रूपये घेतले. १ महिन्यानंतर ३६ नागरिकांना चेक दिले. मात्र काही दिवसांतच संपूर्ण चेक वापस घेऊन कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा करू, असे आश्वासन दिले. मात्र वर्ष लोटूनसुद्धा कर्जाची रक्कम जमा झाली नाही.
याबाबत नागरिकांनी विचारपूस केली असता, दोघेही कुठेच अधिकारी नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर याबाबतची तक्रार नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या दोघांनाही पकडून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पांडूरंग भांडेकर, चंदू कोठारे, रामचंद्र सातपुते यांच्यासह इतरांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Millions are tricked by showing lenders to lend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.