लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया आता आपल्याकडे रोबोट करणार फुकटात!

By admin | Published: May 4, 2017 05:59 PM2017-05-04T17:59:37+5:302017-05-04T18:04:25+5:30

हा झाला फक्त एक रोबोट, तुम्हाला माहीत आहेत मेडिकल फिल्डमध्ये किती प्रकारचे रोबोट्स आहेत ते?

Millions of rupees surgery will cost you robots now! | लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया आता आपल्याकडे रोबोट करणार फुकटात!

लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया आता आपल्याकडे रोबोट करणार फुकटात!

Next

 - मयूर पठाडे

रोबोट येणार, येणार म्हणून कधीची चर्चा होती. हा रोबोट एकदाचा आता खरोखर येऊ घातलाय. अर्थात भारतातही रोबोट्सची काही कमी नाही, पण हा जो नवा रोबोट आता येऊ घातलाय, तो येतोय सरकारी दवाखान्यात!
दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आता हा रोबो येऊ घातलाय आणि किडनीसहित कॅन्सरसंबंधित अनेक किचकट शस्त्रक्रिया आता तो तिथे डॉक्टरांच्या मदतीनं पार पाडेल.
या रोबोटचं खास वैशिष्ट्य म्हणजे गरिबांवर तो मोफत उपचार करणार आहे. काही खासगी हॉस्पिटल्समध्ये आजही रोबोट्सच्या साहाय्यानं उपचार, शस्त्रक्रिया केल्या जातात, पण त्यासाठीची भरभक्कम फीही रुग्णांना मोजावी लागते. या रोबोटिक शस्त्रक्रियांची फी आहे किमान चार ते पाच लाख रुपये!
 
 
किचकट आणि अवघड शस्त्रक्रियांसाठी आता रोबोट्सचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो, विशेषत: पाश्चात्य देशांत या रोबोट्सचं प्रमाण खूपच मोठं आहे, पण दिल्लीच्या सफदरजंग या सरकारी रुग्णालयात दाखल होणारा हा रोबोट आता गरिबांवर मोफत शस्त्रक्रिया करणार आहे ही त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थातच कोणावर मोफत शस्त्रक्रिया होणार, कोणाला त्याचा लाभ होणार, कोणत्या शस्त्रक्रियांसाठी हा रोबोट वापरला जाणार यासंदर्भातील सारी नियमावली सरकारततर्फे स्पष्ट केली जाईल. 
पण तूर्तास तरी हा रोबोट दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये येऊ घातलाय. आयात केल्या जाणार्‍या या रोबोटची किंमत 18 कोटी रुपये आहे. अर्थातच हा ‘प्रयोग’ आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला, तर सरकारी रुग्णांलयात आणखीही रोबोट आलेले आपल्याला दिसतील आणि वेगवेगळ्या किचकट ऑपरेशन्समध्ये ते कधी डॉक्टरांना मदत करतील, तर कधी स्वत:च या शस्त्रक्रिया करतील. सफदरजंग हॉस्पिटलमध्येही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे रोबोट्स आपल्याला दिसू शकतील.
किडनी शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील विविध शस्त्रक्रिया तसेच वेगवेगळ्या किचकट ऑपरेशन्ससाठी या रोबोटचा उपयोग केला जाणार आहे. ही शस्त्रक्रिया करीत असताना त्याच्या थ्री डी प्रतिमाही दिसू शकतील.
आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोबोटमुळे या किचकट शस्त्रक्रिया अत्यंत सुबकतेने आणि डॉक्टरांपेक्षा अधिक क्षमतेने आणि कौशल्याने तर पार पडतीलच, पण त्यासाठीचा वेळही खूपच कमी होणार आहे. उदाहरणार्थ मुत्राशयासंदर्भातील कॅन्सरच्या शस्त्रक्रियेला जवळपास चार तास लागतात, पण हीच शस्त्रक्रिया रोबोटच्या साहाय्यानं केली तर त्याला एक तासापेक्षाही कमी वेळ लागेल, शिवाय ती जास्त अचूकही होईल.
वेळ कमी झाल्यामुळे गुंतागुंतीच्या अधिक शस्त्रक्रिया पार पडतील आणि त्याच्या यशाचं प्रमाणही खूपच मोठं असेल. 
पण केवळ किचकट शस्त्रक्रियांसाठीच नव्हे, मेडिकल फिल्डमध्ये अँक्टिव्ह असलेले हे रोबोट्स आणखीही बर्‍याच गोष्टी करतात. 
तुम्हाला माहीत आहे ते?
 
मेडिकल फिल्डमधील रोबोट्स
1- सर्जिकल रोबोट्स-
कोणत्याही मानवापेक्षा अधिक अचूकतेने हे रोबोट्स ऑपरेशन्स तर करू शकतातच, पण जिथे डॉक्टरच नाहीत, अशा रिमोट ठिकाणीही ते अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
 
2- रिहॅबिलिटेशन रोबोट्स-
रुग्णांच्या पुनर्वसनाचं काम हे रोबोट्स करतात. म्हणजे काय करतात? दुबळ्या, अपंग व्यक्ती, म्हातारे लोक. त्यांची कामं, त्यांच्यावरचे उपचार या सार्‍या गोष्टी हे रोबोट्स करू शकतात.
 
3- टेलिप्रेझेन्स रोबोट्स-
रिमोट ठिकाणी असलेल्या डॉक्टरांना मदत, त्यांच्याशी संवाद आणि त्यांना सहाय्य करण्याचं काम हे रोबोट्स करतात.
 
4- फार्मसी ऑटोमेशन-
औषध निर्माण क्षेत्रातही या प्रकारच्या रोबोट्सचा खूप मोठा उपयोग सध्या होतो आहे.
 
5- डिसइन्फेक्शन रोबोट्स-
आपली खोली, हॉस्पिटल्स निर्जंतुक करण्यासाठी या रोबोट्सचा उपयोग केला जातो. व्हायरसचा प्रचार आणि प्रसार रोखण्यासाठी, विशेषत: अल्ट्राव्हायोलेट टेक्नॉलॉजीचा वापर करून अक्षरश: काही मिनिटांत हे निर्जंतुकीकरण होऊ शकते. 

Web Title: Millions of rupees surgery will cost you robots now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.