Y दर्जाच्या सुरक्षेवर होतोय लाखोंचा खर्च? वकिलाच्या प्रश्नाला कंगना राणौतने दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 09:05 AM2020-09-15T09:05:21+5:302020-09-15T09:11:52+5:30
कंगनाला दिलेल्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारला दहमहा लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने कंगनाना दिलेल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली - शिवसेनेशी थेट पंगा घेऊन वादाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर आता अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्सच्या विषयावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केल्याने कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात वादाला तोंड फुटले होते. तेव्हा कंगनाने मुंबई आपल्यासाठी असुरक्षित वाटत असल्याचे विधान केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने कंगनाला वाय दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या सुरक्षेसाठी केंद्र सरकारला दहमहा लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयातील एका वकिलाने कंगनाना दिलेल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात वकील असलेल्या ब्रिजेश कलाप्पा यांनी कंगनाला दिलेल्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या व्यक्तीला वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यासाठी केंद्र सरकाराला दर महिन्याला १० लाखांहून अधिक पैसे खर्च करावे लागतात. हा पैसा कर भरणाऱ्या लोकांचा आहे. मात्र आता कंगना हिमाचल प्रदेशमध्ये सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार तिला दिलेले संरक्षण हटवणार का? अशी विचारणा या वकिलाने ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
Y category security for one person costs the Centre over 10,00,000/- each month. This money is borne by taxpayers.
— Brijesh Kalappa (@brijeshkalappa) September 14, 2020
Now that Kangana is safe in HP (far away from POK), will Modi Sarkar kindly withdraw the security detail provided to her?! https://t.co/UdEArImhJu
आता या ट्विटला कंगना राणौतनेही त्वरित प्रत्युत्तर दिले आहे. ब्रिजेशजी, मी काय विचार करते, तुम्ही काय विचार करता याच्या आधारावर संरक्षण दिले जात नाही. इंटेलिजेन्स ब्युरोकडून संभाव्य धोक्याचा तपास केला जातो. त्या धोक्याच्या आधारावार कुठल्या दर्जाचे संरक्षण पुरवायचे याचा विचार केला जातो. ईश्वराची इच्छा असेल तर पुढच्या काही दिवसांत मला दिलेले संरक्षण पूर्णपणे हटवले जाईल. मात्र इंटेलिजेन्स ब्युरोला खराब रिपोर्ट मिळाला तर कदाचित माझी सुरक्षा वाढवली जाईल, असे कंगनाने म्हटले आहे.
Brijesh ji security is not given based on what you or I think, IB ( Intelligence Bureau) investigates the threat, based on the threat my security grade is decided, by the grace of God in coming days it might get totally removed or if IB report gets worse they might upgrade.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
शिवसेना आणि कंगना यांच्यात वाकयुद्ध सुरू झाल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत आली होती. मात्र तिच्या प्रक्षोभक विधानांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडले होते. त्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची तुलना राम मंदिरा आणि बीएमसीची तुलना बाबरच्या सैन्याशी केली होती.
मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; पीओकेवरून हटेना, टार्गेट शिवसेना!
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत काल मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला होता. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे. कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धड़ियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमज़ोर समझ कर, बहुत बड़ी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतनं महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचं वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तर मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचा निशाणा शिवसेनेवर साधला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी