Bharat Bandh Live: ओडिसामध्ये हिंसक आंदोलन; प. बंगालमध्ये TCM-CPM कार्यकर्ते भिडले

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:24 AM2019-01-08T08:24:08+5:302019-01-08T10:10:15+5:30

मुंबई : केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्यातील रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांसह पोस्ट, बीएसएनएल कर्मचा-यांनी उडी घेतली आहे. याशिवाय ...

Bharat Bandh Live: ओडिसामध्ये हिंसक आंदोलन; प. बंगालमध्ये TCM-CPM कार्यकर्ते भिडले | Bharat Bandh Live: ओडिसामध्ये हिंसक आंदोलन; प. बंगालमध्ये TCM-CPM कार्यकर्ते भिडले

Bharat Bandh Live: ओडिसामध्ये हिंसक आंदोलन; प. बंगालमध्ये TCM-CPM कार्यकर्ते भिडले

Next

मुंबई : केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्यातील रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांसह पोस्ट, बीएसएनएल कर्मचा-यांनी उडी घेतली आहे. याशिवाय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेनेही संपात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना या संपाचा मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, संपात सामील होणा-या आणि पाठिंबा देणा-या सर्व घटकांचे प्रतिनिधी आझाद मैदानात सकाळी ११ वाजता एकवटणार असल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली.
उटगी म्हणाले, बीएसएनएल आणि जीपीओ कर्मचा-यांनी संपात उडी घेतल्याने ग्रामीण भागातही संपाचा मोठा परिणाम दिसेल. याशिवाय आरबीआय कर्मचारी संघटना संपात सक्रिय सामील होणार आहेत. शिक्षक, प्राध्यापक संपात सामील होणार नसले, तरी संपाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानासह जिल्हास्तरावर होणा-या निदर्शनांमध्ये ते मोठ्या संख्येने सामील होतील.

LIVE

Get Latest Updates

03:56 PM

प. बंगालमध्ये कामगार संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण

पश्चिम बंगालः कामगार संघटनांच्या आंदोलनाला २४ परगाना जिल्ह्यात हिंसक वळण, आंदोलकांनी बस फोडल्या आणि जाळपोळ केली.

10:29 AM

रेल रोको आंदोलन

पश्चिम बंगालः कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी  हावडा येथे रेल रोको आंदोलन



 

10:00 AM

टीएमसी आणि सीपीएम कार्यकर्ते आक्रमक

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपावरुन टीएमसी आणि सीपीएम कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचे समजते.



 

09:55 AM



 

09:48 AM

ओडिसामध्ये कामगार संघटनांनी केले चक्का जाम

ओडिसामध्ये कामगार संघटनांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.  



 

09:44 AM



 

09:36 AM

जीपीओमध्ये नियंत्रण कक्ष

मुंबई : विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामध्ये टपाल कर्मचारी व आयकर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे टपाल खात्याने कर्मचा-यांच्या संपाची माहिती घेऊन उपाययोजना करण्यासाठी जीपीओ येथील मुख्यालयात महाराष्ट्र व गोवा सर्कल स्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केला असून या माध्यमातून सर्कलमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

09:01 AM

कर्नाटकमध्ये कामगार संघटनांचे आंदोलन



 

08:46 AM

ओडिसामध्ये कामगार संघटना आक्रमक

ओडिसामध्ये कामगार संघटनांनी चक्का जाम आंदोलन केले. 



 

08:40 AM



 

08:26 AM

कामगार संघटनांचा देशव्यापी संप सुरू



 

Web Title: Bharat Bandh Live: ओडिसामध्ये हिंसक आंदोलन; प. बंगालमध्ये TCM-CPM कार्यकर्ते भिडले

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप