पंतप्रधान मोदींची नक्कल करणं पडलं महागात! श्याम रंगीलावर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 12:58 PM2023-04-17T12:58:26+5:302023-04-17T13:01:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करुन फेमस झालेला श्याम रंगीला आता अडचणीत सापडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करुन फेमस झालेला श्याम रंगीला आता अडचणीत सापडला आहे. राजस्थान वन विभागाने नोटीस जारी करत कारवाईचे आदेश दिले आहेत. आता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्टनुसार श्याम विरोधात कारवाई होऊव शकते. श्याम रंगीला याने नुकतेच जयपूरच्या झालाना जंगलात जाऊन नीलगायींना खाऊ घातले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
१८ वर्ष लागली, नववधूचा शाप खरा ठरला! विवाहाच्या नवव्या दिवशी अतिकने केला होता पतीचा मर्डर
'१३ एप्रिल रोजी श्याम रंगीला या यूट्यूब चॅनलवर झलाना बिबट्या राखीव जागेचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये श्याम कारमधून खाली उतरून नीलगायींना हाताने अन्न खाऊ घालताना दिसत आहे. वन्य प्राण्यांना अन्न देणे हे वन कायदा १९५३ आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील तरतुदींचे उल्लंघन आहे, अशी माहिती जयपूरचे प्रादेशिक वन अधिकारी जनेश्वर चौधरी यांनी दिली.
वन्य प्राण्यांना खाद्य पदार्थ खायला घातले तर त्याचे गंभीर आजार होऊ शकतात. वन्य प्राण्यांना खाद्य पदार्थ खायला देऊ नयेत असे बोर्डही लावण्यात आले आहेत. पण, तरीही श्याम रंगीला याने प्राण्यांना खाद्य पदार्थ खायला दिले.
श्याम रंगीला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुबेहुब नक्कल करतात. यावरुन त्यांच्यावर ते ट्रोल होत असतात. काही दिवसापूर्वीच कर्नाटकातील टायगर प्रोजेक्टला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी बांदीपूर अभयारण्यला भेट दिली. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
याच फोटोंची नक्कल मिमिट्री आर्टिस्ट श्याम रंगीला याने राजस्थान येथील झालाना जंगलात नक्कल केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत तो नीलगायला खाद्य पदार्थ खायला देत असल्याचे दिसत आहे.
'श्याम रंगीला याने या कृत्याने केवळ वन्यप्राण्यांचा गुन्हाच केला नाही, तर त्याने व्हिडिओ शूट प्रसारित करून इतरांनाही गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त केले आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी लागेल. यासाठी श्याम रंगीला यांना सोमवारी प्रादेशिक वन अधिकारी, जयपूर यांच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. श्याम रंगीला वेळेवर हजर न झाल्यास त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितले.