किमान तापमान ८ अंश सेल्सीअसवर
By Admin | Published: December 27, 2015 12:12 AM2015-12-27T00:12:06+5:302015-12-27T00:12:06+5:30
जळगाव : शहराचे तापमानाने निचांकी गाठली असून, शनिवारी ममुराबाद ता.जळगाव येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत हवामानशास्त्र विभागात ८ अंश सेल्सीअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.
ज गाव : शहराचे तापमानाने निचांकी गाठली असून, शनिवारी ममुराबाद ता.जळगाव येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कार्यरत हवामानशास्त्र विभागात ८ अंश सेल्सीअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. गुरुवारी ८.४ अंश सेल्सीअस तर शुक्रवारी ९.२ अंश सेल्सीअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. या आकडेवारीनुसार थंडीचे प्रमाण किंचीत कमी अधिक होत आहे. पुढील तीन दिवस थंडी आणखी कमी होईल, असा अंदाज ममुराबाद येथील हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. थंडी वाढत असल्याने रात्रीची वर्दळ कमी होऊ लागली आहे.