CM योगींच्या शेजारी 'भूत बंगला', राहण्यास घाबरतात मंत्री व अधिकारी
By admin | Published: March 29, 2017 06:03 PM2017-03-29T18:03:58+5:302017-03-29T18:03:58+5:30
उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊच्या कालिदास मार्गावरील बंगला क्रमांक 5 मध्ये राहणार तर...
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 29 -उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊच्या कालिदास मार्गावरील बंगला क्रमांक 5 मध्ये राहणार आहेत. त्यांच्या शेजारी बंगला क्रमांक 6 आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी राहण्याची कोणाची इच्छा नसेल, पण खरंतर या बंगल्यात राहण्यास अधिका-यांपासून मंत्र्यांपर्यंत सगळे टाळाटाळ करत आहेत.
आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्रीही या बंगल्यात राहण्यास नकार देत आहेत. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे. यामागचं कारण काय याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेल. याचं कारण आहे, या बंगल्याचा इतिहास. हा बंगला अपशकुनी असल्याचं म्हटलं जातं. या बंगल्यात जो कोणी राहायला आला तो नेहमी वादात अडकला.
बंगल्यात राहायला आलेले नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडले. मुलायम सरकारच्या काळात मुख्य सचिव असलेल्या नीरा यादव या बंगल्यात राहात होत्या. त्या नोयडा प्लॉट घोटाळ्यामध्ये अडकल्या आणि त्यांना तुरूंगाची हवाही खावी लागली. असंच एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणारे अमर सिंग. तेही याच बंगल्यात कधीकाळी राहात होते. आज त्यांची राजकिय कारकीर्द अडचणीत आहे. प्रदीप शुक्ला हे आणखी एक नेता एनएचआरएम घोटाळ्यामध्ये अडकले. मायावती यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले बाबू सिंग कुशवाहा यांचंही एक नाव आहे. त्यांच्याकडे अऩेक विभागांची जबाबदारी होती. पण सीएमओ खून , एनएचआरएम आणि लॅकफेड घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. अशा प्रकारची अनेक नावं आहेत.
याशिवाय स्थानीक लोकं याला भूत बंगलाही म्हणतात. त्यामुळे कोणी मंत्री अथवा अधिकारी या बंगल्यात राहण्यास टाळाटाळ करत आहेत.