हौसेला मौल नाही! मंत्र्यांनी उडवली चक्क सोन्याची पतंग; किंमत ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 10:51 AM2023-01-22T10:51:37+5:302023-01-22T11:01:08+5:30

मंत्र्यांनाही सोन्याची पतंग उडवण्याचा मोह आवरता आला नाही.

minister driven gold made kite at meerut know the price and special factors | हौसेला मौल नाही! मंत्र्यांनी उडवली चक्क सोन्याची पतंग; किंमत ऐकून व्हाल हैराण

फोटो - news18 hindi

googlenewsNext

सोन्याची पतंगही उडू शकतो का, सोन्याचा धागाही असू शकतो का? असे अनेक प्रश्न हे पतंगाबाबत पडू शकतात. पण हेच खरं आहे. कारण उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अशी हटके पतंग तयार करण्यात आली आहे, जी फक्त सोन्यापासून बनवली आहे. मेरठमध्ये झालेल्या इन्व्हेस्टर्स समिटमध्ये आलेल्या मंत्र्यांनाही सोन्याची पतंग उडवण्याचा मोह आवरता आला नाही. यूपी सरकारमधील एमएसएमई मंत्री आर के सचान यांनी सोन्याची पतंग असलेला स्टॉल पाहिला तेव्हा त्यांनी सोन्याची पतंग उडवली.

सोन्याची पतंग उडवल्यानंतर मंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. जेव्हा मंत्र्यांनी या सोन्याच्या पतंगासोबत सेल्फी काढला तेव्हा मेरठचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीणा यांनाही सोनेरी पतंगासोबत सेल्फी घेण्यापासून राहवलं नाही. मंत्री आणि डीएम यांनी या इनोवेशनचं कौतुक केलं. मंत्री आर के सचान म्हणाले की, त्यांनी अनेक पतंग पाहिले आहेत, पण सोन्याची पतंग पहिल्यांदाच पाहिली. 

यावेळी प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमी एकत्र असल्याचं सोन्याचे पतंग बनवणारे सराफा व्यापारी सांगतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमीच्यानिमित्ताने मेरठच्या थापर नगरमध्ये सोन्याचे पतंग उडवले जाणार आहेत. या पतंगाची किंमत एकवीस लाख आहे. एकवीस लाख किमतीची ही पतंग सोन्याची आहे. या स्पेशल पतंगाची किंमत ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सराफा व्यापारी अंकुर यांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनासाठी ही खास पतंग तयार करण्यात आली आहे. ही पतंग सोन्याची आहे. सात कारागिरांनी 16 दिवसांत ही पतंग तयार केली आहे. त्याची खासियत म्हणजे त्यावर सोन्याचा थर असतो. त्याचा धागा देखील सोन्याचा बनलेला आहे. सध्या या सोन्याच्या पतंगाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: minister driven gold made kite at meerut know the price and special factors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.