...अन् भाजपा मंत्र्याने घरीच घेतली कोरोना लस; यात काय चुकीचं आहे? म्हणत केला अजब खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 10:33 AM2021-03-03T10:33:00+5:302021-03-03T10:40:28+5:30
BJP BC Patil And Corona Vaccine : बी. सी. पाटील यांनी देखील कोरोनावरील लस घेतली. पण पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहेत. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली. मोदींनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर अनेक नेतेमंडळींनी देखील लस घेतली आहे. याचदरम्यान कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील (BC Patil) यांनी देखील कोरोनावरील लस घेतली. पण पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कर्नाटकचे मंत्री बी. सी. पाटील यांनी घरी कोरोना लस घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. घरी लस का घेतली याबाबत पाटील यांनी अजब खुलासा केला आहे. कोरोनावरील लस असुरक्षित आहे, ही नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी आपण रुग्णालयामध्ये जाण्याऐवजी घरीच लस घेतली असं पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली असती तर आपल्यामुळे इतर नागरिकांना ताटकळत राहावं लागलं असतं. मात्र इथे मी नागरिकांनाही भेटू शकतो आणि लसही घेऊ शकतो. यात चुकीचं काय आहे? असं पाटील यांनी म्हटलं आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
#UPDATE | Karnataka: Haveri District Health Officer Dr. Rajendra Doddamani issues notice to Taluk Health Officer ZR Makandar over state minister BC Patil being administered COVID-19 vaccine at his residence. https://t.co/NujKhGN4IJ
— ANI (@ANI) March 2, 2021
बी. सी. पाटील यांनी हावेरी जिल्ह्यातील हिरेकेरुर या आपल्या गावातील घरी कोरोना लस घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रोटोकॉलनुसार अशी कुठलीही परवानगी नाही. राज्य सरकारला यासंबंधी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं राजेश भूषण यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र डोड्डामणी यांनी तालुक्याचे आरोग्य अधिकारी झेड. आर. मकंदर यांना नोटीस बजावली आहे.
CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! कोरोनाचा वेग वाढतोय, प्रशासनाच्या चिंतेत भर; "या" नियमांचं करा पालनhttps://t.co/RDm75scTKt#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 1, 2021
फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण
मोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे मोदींनी घेतलेली कोरोना लस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे.
CoronaVirus News : आशेचा किरण! फक्त कोरोनाच नाही तर लोकांचे इतरही आजार झाले बरे, रिसर्चमधून मोठा खुलासाhttps://t.co/ENhgII6Vu4#coronavirus#CoronaVirusUpdates#CoronaVaccine#CoronavirusVaccine#CoronaVaccination
— Lokmat (@MiLOKMAT) March 2, 2021