Nitin Gadkari : केव्हा दूर होणार महाराष्ट्र सरकारवरील संकट? गडकरी म्हणाले, "आगे आगे देखिए होता है क्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:05 PM2022-06-25T13:05:33+5:302022-06-25T13:06:28+5:30
महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे? यावर गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल.
देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर आलेल्या संकटासंदर्भात भाष्य केले आहे. मला वाटते, की महाराष्ट्र सरकारवरील संकट लवकरच दूर होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यावेळी, हे संकट आपण दूर कराल का? असा प्रश्न विचारला आला असता, गडकरी म्हणाले, "आगे-आगे देखो होता है क्या."
गडकरी म्हणाले, आजच्या समस्येत उद्याची उत्तरं लपलेली असतात. लवकरच सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळतील. आलेले ढग दूर होतील. अंधकार नष्ट होईल आणि सूर्य उगवेल. यावर, सीएम ठाकरेंवर घोंगावणारे ढग दूर होतील का? आपले आणि त्यांचे संबंध अगदी जवळचे आहेत, असे मानले जाते? असा प्रश्न केला असता, गडकरी म्हणाले, वेयक्तीक संबंध, हे राजकीय संबंधांपेक्षा वेगळे असतात. मग ते सरकारमध्ये असोत अथवा नसोत. संबंध तसेच असतात. ते झी टीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत गडकरी म्हणाले, ते (वाजपेयी) म्हणाले होते, सरकारे येतात आणि जातात, पार्ट्या तयार होतात आणि संपतात, पण देश हाच असतो. सर्वांना देशासाठी काम करायचे आहे. भारताला महाशक्ती बनविण्यासाठी काम करायचे आहे. आपण चालत राहायला हवे, हा प्रकृतीचा निय आहे.
महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे? यावर गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल.