भाजपाचं धक्कातंत्र, चंद्रशेखर यांना उमेदवारी नाकारली, मंत्र्यांमध्ये भीती?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:11 AM2024-02-13T07:11:57+5:302024-02-13T07:13:06+5:30
गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंडमधून उर्वरित १५ उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये चांगली कामगिरी असलेले इलेक्ट्रॉनिक्स व आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना राज्यसभेचे तिकीट नाकारल्याने केंद्रीय मंत्र्यांमध्ये अक्षरश: भीती पसरली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने सात राज्यांतील १४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंडमधून उर्वरित १५ उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. महायुती महाराष्ट्रात ६ पैकी ५ जागा जिंकण्याची शक्यता आहे. भाजप सहावा उमेदवार उभा करू शकतो, असे वृत्त आहे.
या मंत्र्यांना उमेदवारीची प्रतीक्षा
मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला (गुजरात), धर्मेंद्र प्रधान (मध्य प्रदेश), नारायण राणे, व्ही. मुरलीधरन (महाराष्ट्र) आणि अश्विनी वैष्णव (ओडिशा) यांचा समावेश आहे. प्रधान, यादव, चंद्रशेखर वगळता उर्वरित मंत्री हे राज्यसभेत पहिल्या टर्मचे सदस्य आहेत.