सत्येंद्र जैन तुरुंगात घेतात मसाज, मिळाहेत अनेक सुविधा; ED ची कोर्टात तक्रार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 01:16 PM2022-10-30T13:16:53+5:302022-10-30T13:19:15+5:30
दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन हे तुरुंगात ऐशोआरामाचं आयुष्य जगत आहेत.
दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन हे तुरुंगात ऐशोआरामाचं आयुष्य जगत आहेत. त्यांना कारागृहात सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी तुरुंगात अनेकदा मसाज घेतला आहे असं प्रतिज्ञापत्र अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात सादर केलं आहे. मंत्री जैन यांच्या पत्नी अनेकदा त्यांना भेटायला येतात आणि त्यांना घरचे जेवणही दिले जात असल्याचे सांगण्यात आलं आहे. ईडीनं प्रतिज्ञापत्रासोबत या संदर्भातील काही छायाचित्रेही दिली आहेत. यातील काही फोटो हे सत्येंद्र जैन मसाज घेतानाचेही आहेत. मंत्री सत्येंद्र जैन सध्या तिहार तुरुंगात आहेत.
न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ईडीने सांगितलं की, तिहार तुरुंगात मंत्री सत्येंद्र जैन यांना केवळ डोक्याचा मसाजच दिली जात नाही, तर त्यांना वेळोवेळी पायाची मालिश आणि पाठीचा मसाज यांसारख्या सुविधाही दिल्या जात आहेत. व्हिडिओ फुटेज सादर करताना ईडीने जेलच्या नियमावलीचे उल्लंघन करून सत्येंद्र जैन यांना भेटण्यास शिथिल केल्याचा तुरुंग अधीक्षकांवर आरोप केला आहे. मंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी जवळपास दररोज येथे येत असून त्यांना घरचे जेवणही दिले जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. ईडीनं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या दाव्यानुसार सत्येंद्र जैन यांच्यासह याच प्रकरणातील अन्य आरोपी अंकुश जैन आणि वैभव जैन देखील तासनतास बैठक घेतात. अंकुश आणि वैभव सध्या तिहार तुरुंगात आहेत.
कारागृह प्रशासनाने आरोप फेटाळले
तिहार प्रशासनाने ईडीने लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ईडीने सत्येंद्र जैन यांच्या सेलचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सत्येंद्र जैन यांच्या सेलमध्ये ना कोणी बाहेरून आलं होतं ना त्यांना घरचं जेवण दिलं गेलं.
कारागृह प्रशासनाच्या दाव्यानुसार ईडीने इतर कैद्यांशी बोलण्याचा केल्याचा आरोप आहे, परंतु जे कैदी त्याच बराकमध्ये असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना एकमेकांशी बोलणं काही अवघड नाही. पण मोजणीनंतर जेव्हा सर्व कैदी आपापल्या कोठडीत जातात, तेव्हा त्यापैकी कोणीही एकमेकांच्या कोठडीत जाऊ शकत नाही. तुरुंगात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरत असल्याचंही वृत्त तिहार प्रशासनाने फेटाळून लावलं आहे.