Minister Throws Stone : तामिळनाडूच्या मंत्र्यांनी आपल्याच कार्यकर्त्यावर केली दगडफेक; Video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:10 PM2023-01-24T16:10:33+5:302023-01-24T16:19:52+5:30
Tamil Nadu News : कार्यकर्त्यांनी खुर्ची आणली नाही म्हणून मंत्री चिडले आणि दगड फेकला.
DMK Minister Viral Video: तमिळनाडूचे मंत्री एसएम नासार यांनी तिरुवल्लूरमध्ये द्रमुकच्या कार्यकर्त्यावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 7 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये नासार एका मोकळ्या जागेत उभे आहेत, त्यांच्या मागे काही लोकही उभे दिसत आहेत. तसेच, नासर एका कार्यकर्त्यावर रागावल्याचेही दिसत आहे. यानंतर अचानक त्यांचा संयम सुटतो आणि ते दगड उचलू द्रमुकच्या कार्यकर्त्यावर फेकतात.
बसायला खुर्ची न दिल्याने मंत्री नाराज
एसएम नासार हे दुग्धविकास मंत्री आहेत. केंद्र सरकारने दुधावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्याची चुकीची माहिती पसरवून नासार गेल्या वर्षी चर्चेत आले होते. 4 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य सरकारच्या मालकीच्या अवीनने दुधाच्या दरात वाढ केली होती. गायीच्या दुधाचा खरेदी दर 32 रुपयांवरून 35 रुपये करण्यात आला होता. तर म्हशीच्या दुधाचा दर 41 रुपयांवरून 44 रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी, अवीनच्या फुल-क्रीम दुधाच्या (ऑरेंज पॅकेट) किंमतीत 12 रुपयांनी वाढ करण्यात आली आणि त्याची किंमत आता 60 रुपये झाली.
#WATCH | Tamil Nadu Minister SM Nasar throws a stone at party workers in Tiruvallur for delaying in bringing chairs for him to sit pic.twitter.com/Q3f52Zjp7F
— ANI (@ANI) January 24, 2023
तेव्हा द्रमुक मंत्री म्हणाले होते, 'केंद्र सरकारने दुधावरही जीएसटी लावला आहे. हा अभूतपूर्व निर्णय आहे. दुधावर जीएसटी लागू झाल्याने दुधाचे दर वाढले आहेत. त्यानंतर भाजपने द्रमुकच्या मंत्र्यावर जोरदार हल्ला चढवला. एसएम नासार यांच्यावर हल्ला करताना, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई म्हणाले होते की, दूध जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे हे त्यांनाही माहित नाही.