Video : ... अन् आदिवासी विकास मंत्र्यांनी हातावर चालत पार केला धोकादायक पूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 08:27 PM2021-07-30T20:27:30+5:302021-07-30T20:43:11+5:30
महाराष्ट्रातील कोकण आणि प. महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी अद्यापही नद्यांचा प्रवाह मोठ्या गतीने वाहत आहे.
शिमला - देशभरातील विविध राज्यांत सध्या पावसामुळे रस्ते खचले आहेत. पुराच्या पाण्यामुळे नद्यांचा प्रवाह विस्तीर्ण आणि धोकादायक पातळी ओलांडून वाहत आहे. त्यातच, दरड कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमावला आहे. काही दिवसांपूर्वीचहिमाचल प्रदेशातील कनौर येथे दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता. अद्यापही येथील नद्यांना पूर असल्याने प्रवास धोकादायकच बनला आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशच्यामंत्री महोदयांनाही चक्क हातावर चालून रस्ता पार करावा लागला आहे.
महाराष्ट्रातील कोकण आणि प. महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी अद्यापही नद्यांचा प्रवाह मोठ्या गतीने वाहत आहे. महाराष्ट्रातील दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच हिमाचल प्रदेशमध्येही दरड कोसळून भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये, 9 पर्यटकांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशमध्येही पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
#WACTH | Himachal Pradesh Tribal Development Minister & MLA from Lahaul and Spiti, Ramlal Markanda cross a rivulet in Shansha Village where a bridge was damaged due to another flash flood in the region pic.twitter.com/hMdIiMYR3e
— ANI (@ANI) July 30, 2021
हिमाचल प्रदेशचे आदिवासी विकासमंत्री आज चक्क हातावर चालून मार्ग काढताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी टाकलेल्या शिडीवरुन ते हातावर चालताना दिसत आहेत. त्यावेळी, मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा प्रवाहाच्या दोन्ही दिशेला दिसून येत आहे. रामलाल मार्कंड असं या मंत्रीमोहदयांचे नाव असून ते लाहौल आणि स्पीती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. येथील शंशा या गावातील पूल तुटल्यामुळे तेथे अशा पद्धतीने जुगाड करुन त्यांनी रस्ता पार केला.