मंत्र्याच्या भावाच्या गॅस एजन्सीवर घातला छापा

By admin | Published: January 16, 2017 05:01 AM2017-01-16T05:01:10+5:302017-01-16T05:01:10+5:30

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भावाच्या गॅस एजन्सीवर छापा घालण्यात आल्याने खळबळ उडाली

The minister's brother's gas company raided | मंत्र्याच्या भावाच्या गॅस एजन्सीवर घातला छापा

मंत्र्याच्या भावाच्या गॅस एजन्सीवर घातला छापा

Next


नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भावाच्या गॅस एजन्सीवर छापा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भेसळ आणि काळाबाजार याच्या तक्रारी आल्यानंतर ओडिशात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता शाखेने काही एजन्सींवर छापे घातले. यात प्रधान यांच्या भावाच्या एजन्सीचाही समावेश आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि डिझेल, पेट्रोलमध्ये भेसळीच्या तक्रारीनंतर कोरापूट, नवरंगपूर, पुरी, भुवनेश्वर, बरहामपूर, बलसोर, संबालपूर, बारगढ, अंगुल आणि कटक या ठिकाणी हे छापे घालण्यात आले. यातील एक एजन्सी
केंद्रीय मंत्री प्रधान यांच्या भावाची आहे. अंगुल जिल्ह्यात तेलचर येथे ही गॅस एजन्सी आहे. दरम्यान, याबाबत संपर्कासाठी केंद्रीय मंत्री प्रधान हे उपलब्ध होऊ शकले नाहीत. भाजपचे प्रदेश महासचिव पृथ्वीराज हरिचंदन म्हणाले की, बिजू जनता दलाकडून कशा प्रकारे तपास एजन्सींचा चुकीचा वापर केला जात आहे ते यातून दिसते.
स्थानिक पुरवठा विभाग आणि वजनमापे विभागाचे यासाठी सहाय्य घेण्यात आले. काही एजन्सींवर अनियमितता आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. काही ठिकाणी कमी अथवा अतिरिक्त साठाही आढळला. एका एजन्सीवर ग्राहकांना कमी प्रमाणात इंधन देत असल्याचे दिसून आले. तेलचरमध्ये एका ग्राहकाला कागदपत्रे नसतानाही गॅस सिलिंडर दिले जात असल्याचे दिसून आले. छापे घालणाऱ्या दक्षता पथकाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी कारवाईसाठी संपर्क केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेलचे नमुने घेण्यात आले असून तेथील व्यवस्थापक आणि सेल्समन यांच्या उपस्थितीत ते सिलबंद करण्यात आले.
अनेक एजन्सींवर स्फोटक वस्तंूचा परवानाच नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत फिलिंग स्टेशन आणि त्यांच्या मालकांविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The minister's brother's gas company raided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.