CoronaVirus News: जाहिरात थांबवा, आधी 'त्या' औषधाची सविस्तर माहिती द्या; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 06:47 PM2020-06-23T18:47:09+5:302020-06-23T19:49:06+5:30
पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहे.
नवी दिल्ली: देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच केलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. मात्र आता पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहे.
आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीने कोरोनावरील उपचारासाठी विकसित केलेल्या कोरोनिल औषधाची आम्ही दखल घेतली आहे. पतंजली कंपनीने या औषधाची योग्य ती माहिती द्यावी, असं आयुष मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच पतंजलीने क्लिनिकल ट्रायल झाल्याचा दावा केला आहे. मात्र त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत असं आयुष मंत्रालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनिल औषधाची योग्य ती तपासणी होईपर्यत या औषधामुळे कोरोना आजार बरा होतो, अशा आशयाची जाहिरात न करण्याचे आदेश देखील आयुष मंत्रालयाकडून पतांजलीला देण्यात आले आहे.
Ministry has taken cognizance of news in media about Ayurvedic medicines developed for #COVID19 treatment by Patanjali Ayurved Ltd. The company asked to provide details of medicines & to stop advertising/publicising such claims till the issue is duly examined: Ministry of AYUSH pic.twitter.com/OBpQlWAspu
— ANI (@ANI) June 23, 2020
संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे, असं रामदेव बाबा यांनी सांगितले. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS) जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.
CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
योगगुरु बाबा रामदेव आणि पंतजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले आहे. बालकृष्णांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोकांनी योगही केला पाहिजे आणि योग्य आहार घ्यावा.
कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुळशी, स्वासारी रस आणि अणु तेलाचे मिश्रण आहे. त्यांच्या मते, हे औषध दिवसातून दोनदा - सकाळी आणि संध्याकाळी घेतले जाऊ शकते असं बाळकृष्ण यांनी सांगितले. पतंजलीच्या मते, या औषधाचा शेकडो रूग्णांवर सकारात्मक क्लिनिकल चाचणी केली आहे. ज्याचा निकाल 100 टक्के आहे. कोरोनिल कोविड -१९ रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
Launch of first and foremost evidence-based ayurvedic medicine for Covid-19@yogrishiramdev@Ach_Balkrishna#Patanjali#आयुर्वेदविजय_कोरोनिल_श्वासारिpic.twitter.com/sjSWq5X0vS
— Patanjali Dairy (@PatanjaliDairy) June 23, 2020