I&B Ministry Hacking: हॅकर थांबेनात! पंतप्रधानांनंतर आता आय अँड बी मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 11:03 AM2022-01-12T11:03:12+5:302022-01-12T11:03:27+5:30

Twitter account hacked पासवर्डची तडजोड झाली आहे किंवा हॅकिंगशी संबंधित लिंकवर क्लिक करण्यात आल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Ministry of Information and Broadcasting Twitter account hacked, restored after few minutes | I&B Ministry Hacking: हॅकर थांबेनात! पंतप्रधानांनंतर आता आय अँड बी मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक

I&B Ministry Hacking: हॅकर थांबेनात! पंतप्रधानांनंतर आता आय अँड बी मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक

Next

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (Ministry of Information and Broadcasting) ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. बुधवारी सकाळीच या अकाऊंटवर जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांचे नाव झळकू लागले होते. तसेच प्रोफाईलला माशाचा फोटो ठेवण्यात आल्याने मंत्रालयात खळबळ उडाली होती. याचबरोबर काही ट्विटदेखील करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच काही वेळात हे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्यात आले, तसेच ट्विटदेखील हटविण्यात आले. हे हॅकर्स तेच असू शकतात ज्यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. कारण त्यावर नेमका तोच मजकूर पाहायला मिळत आहे जो तेव्हा दिसला होता. यापूर्वी ICWA, IMA आदींचे ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले होते.

पासवर्डची तडजोड झाली आहे किंवा हॅकिंगशी संबंधित लिंकवर क्लिक करण्यात आल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. किंवा खाते हाताळणाऱ्या एखाद्याने केले असावे. नंतर CERT म्हणजेच इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने खाते पुन्हा रिस्टोअर केले. हॅकिंगची माहिती आयटी मंत्रालयाच्या ट्विटरवरून देण्यात आली.

Web Title: Ministry of Information and Broadcasting Twitter account hacked, restored after few minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.