नववर्षाच्या सुरुवातीला रेल्वेकडून प्रवाशांना भाडेवाढीचं गिफ्ट   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 08:10 PM2019-12-31T20:10:12+5:302019-12-31T20:18:48+5:30

रेल्वेने केलेली नवी भाडेवाढ ही 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे.

Ministry of Railways revises the basic passenger fare, hike in railway Ticket | नववर्षाच्या सुरुवातीला रेल्वेकडून प्रवाशांना भाडेवाढीचं गिफ्ट   

नववर्षाच्या सुरुवातीला रेल्वेकडून प्रवाशांना भाडेवाढीचं गिफ्ट   

Next

नवी दिल्ली - नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय रेल्वेकडून देशभरातील कोट्यवधी प्रवाशांना भाडेवाढीचे गिफ्ट  दिले आहे. रेल्वेने केलेली नवी भाडेवाढ ही 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. रेल्वेने आपल्या प्रवासी भाडेदरामध्ये कमाल 4 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

रेल्वेने मेल/एक्स्प्रेसच्या नॉन एसीच्या भाड्यात दोन पैसे प्रति किमी एवढी वाढ करण्यात आली आहे. तर एसी ट्रेनच्या भाड्यामध्ये 4 पैसे प्रतिकिमी एवढी वाढ करण्यात आली आहे. मात्र रेल्वेच्या उपनगरीय लोकलसेवेच्या प्रवासी भाडेदरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. 

 रेल्वेच्या तिकिटांमध्ये झालेली भाडेवाढ पुढीलप्रमाणे 

ऑर्डिनरी नॉन एसीचे भाडे 
सेकंड क्लास ऑर्डिनरी - एक पैसा प्रतिकिमी 
स्लीपर क्लास ऑर्डिनरी - एक पैसा प्रतिकिमी 
फर्स्ट क्लास ऑर्डिनरी - एक पैसा प्रतिकिमी
 
मेल/एक्स्प्रेस नॉन एसीचे भाडे
सेकंड क्लास (मेल/एक्स्प्रेस) - 2 पैसे प्रति किमी 
स्लीपर क्लास ( मेल/एक्स्प्रेस) - 2 पैसे प्रति किमी
 फर्स्ट क्लास (मेल/एक्स्प्रेस) - 2 पैसे प्रति किमी 
  
एसी ट्रेनचे भाडे 

एसी चेअर कार - 4 पैसे प्रति किमी 
एसी 3 टियर - 4 पैसे प्रति किमी 
एसी 2 टियर - 4 पैसे प्रति किमी 
एसी फर्स्ट क्लास/ इकॉनॉमी क्लास/ एक्झिक्युटिव्ह क्लास - 4 पैसे प्रतिकिमी  

Web Title: Ministry of Railways revises the basic passenger fare, hike in railway Ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.