पर्यटन मंत्रालयाचा प्रस्ताव गृहमंत्रालयाला नापसंत
By Admin | Published: March 26, 2015 01:09 AM2015-03-26T01:09:43+5:302015-03-26T01:09:43+5:30
चिनी पर्यटकांना व्हिसा आॅन अरायव्हल देण्याच्या पर्यटन मंत्रालयाच्या प्रस्तावावर भुवया उंचावत गृहमंत्रालयाने या प्रस्तावाला नापसंती दर्शविली आहे.
नवी दिल्ली : चिनी पर्यटकांना व्हिसा आॅन अरायव्हल देण्याच्या पर्यटन मंत्रालयाच्या प्रस्तावावर भुवया उंचावत गृहमंत्रालयाने या प्रस्तावाला नापसंती दर्शविली आहे.
सुरक्षेसंबंधित मुद्यांचा विचार केल्याशिवाय चीनला अशी सवलत दिली जाऊ नये, असे गृहमंत्रालयाचे स्पष्ट मत आहे. चीन, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन आणि इटलीला ही सवलत देण्यात यावी, अशी विनंती पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना कालच्या बैठकीत केली होती. त्यानुसार याबाबत येत्या दोन-चार दिवसांत घोषणा केली जाईल, असे संकेतही गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिले आहेत, अशी माहितीही शर्मा यांनी लागलीच पत्रकारांनाही दिली होती. तथापि, या योजनेत (व्हिसा आॅन अरायव्हल) चीनचा समावेश करण्यास गृहमंत्रालय राजी नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)