भिकारी असल्याचे भासवून अल्पवयीन मुलाने चोरला आयफोन

By admin | Published: December 29, 2016 10:27 AM2016-12-29T10:27:17+5:302016-12-29T10:27:17+5:30

भिकारी असल्याचे भासवून एका अल्पवयीने मुलाने ब्राझीलियन दांम्पत्याचा आयफोन चोरल्याची घटना पूर्व दिल्लीमध्ये घडली.

Minor boy stolen iPhone by pretending to be a beggar | भिकारी असल्याचे भासवून अल्पवयीन मुलाने चोरला आयफोन

भिकारी असल्याचे भासवून अल्पवयीन मुलाने चोरला आयफोन

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 29 - भिकारी असल्याचे भासवून एका अल्पवयीने मुलाने ब्राझीलियन दांम्पत्याचा आयफोन चोरल्याची घटना पूर्व दिल्लीमध्ये घडली. अक्षरधाम मंदिराबाहेर हे जोडपे सेल्फी फोटो काढत असताना या मुलाने त्यांच्या हातातून फोन हिसकावून तिथून पळ  काढला. काही तासांच्या शोधानंतर या मुलाला अटक करण्यात आली. 
 
पीट्रो गुस्तावो रॉबिन आणि त्यांची पत्नी जर्सी अक्षरधाम मंदिराबाहेर सेल्फी काढत असताना बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. हा मुलगा तेथे आल्यानंतर त्याने पैसे मागितले पण जोडप्याने नकार दिल्यानंतर तो तिथे थांबला. 
 
काहीवेळाने त्याने फोन हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. काही तासातचं शशी गार्डन परिसरातून पोलिसांनी मुलाला अटक केली. पीट्रो पत्रकार असून जर्सी वकिल आहे. हे ब्राझीलियन जोडपे भारतात पर्यटनासाठी आले आहे. 
 
 

Web Title: Minor boy stolen iPhone by pretending to be a beggar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.