5 हजारात खरेदी, सलग दोन वर्ष बलात्कार; नंतर 30 हजारात विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 01:57 PM2018-01-30T13:57:25+5:302018-01-30T13:58:53+5:30

चाइल्ड लाइनवर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 15 दिवसांपासून बंधक ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलीची रविवारी सुटका केली

A minor girl rescued who was sold for five thousand | 5 हजारात खरेदी, सलग दोन वर्ष बलात्कार; नंतर 30 हजारात विक्री

5 हजारात खरेदी, सलग दोन वर्ष बलात्कार; नंतर 30 हजारात विक्री

googlenewsNext

फरीदाबाद - चाइल्ड लाइनवर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 15 दिवसांपासून बंधक ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलीची रविवारी सुटका केली. धिरज नगरमधील टी-20 कॉलनीत या मुलीला बंधक ठेवण्यात आलं होतं. पीडित मुलगी झारखंडची रहिवासी असून दोन वर्षांपुर्वी तिच्या आजीने पाच हजारात सुरेंद्र नावाच्या तरुणाला तिची विक्री केली होती.  सुरेंद्र दिल्लीहून आला होता. 

पीडित तरुणीने सांगितल्यानुसार, 'जवळपास दोन वर्ष आरोपी तरुणाने पीडित तरुणीला घरकामं करायला लावली आणि बलात्कारही केला. काही दिवसांपुर्वी त्याने 30 हजार रुपयांत मिश्रा नावाच्या एका तरुणाकडे तिची विक्री केली'. पीडित तरुणीचा आरोप आहे की, फरीदाबादमध्येही सुरेंद्र आणि मिश्राने तिच्यावर बलात्कार केला. घरकाम केल्याचे जे पैसे मिळाले होते, ते पैसेही माझ्याकडून जबरदस्ती काढून घेतले असाही आरोप करण्यात आला आहे. 

पीडित तरुणीच्या जबाबानंतर फरीदाबाद पोलिसांचीही झोप उडाली आहे. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. दुसरीकडे, पोलिसांचं एक पथक झारखंडला रवाना झालं असून, दुसरं पथक फरीदाबाद आणि दिल्लीमधील आरोपींच्या ठिकाणांवर छापेमारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसा, चाइल्डलाइनच्या हेल्पलाइनवर शनिवारी रात्री एक फोनकॉल आला होता. यानंतर चाइल्डलाइनची टीम सेक्टर-31 ठाण्यातील पोलिसांसोबत रविवारी सकाळी घटनास्थळी पोहोचली आणि पीडित तरुणीला ताब्यात घेतलं. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. 

एसीपी पूजा डाबला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तरुणीने दिलेल्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेलं नाही'.

Web Title: A minor girl rescued who was sold for five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.