कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन मुलीचे सावकाराशी लग्न
By admin | Published: April 13, 2015 04:24 AM2015-04-13T04:24:20+5:302015-04-13T04:24:20+5:30
कर्ज फेडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचे तिच्या माता-पित्यांनी सावकाराशी लग्न लावून दिल्याचा प्रकार केरळात घडला. सावकाराचे वय हे या मुलीहून दुपटीने अधिक आहे.
Next
इदुक्की (केरळ) : कर्ज फेडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचे तिच्या माता-पित्यांनी सावकाराशी लग्न लावून दिल्याचा प्रकार केरळात घडला. सावकाराचे वय हे या मुलीहून दुपटीने अधिक आहे.
केरळमधील इदुक्की जिल्ह्यातील नेदुमकंडम या दुर्गम खेड्यात ही धक्कादायक घटना घडली. संबंधित मुलीचे काका कन्नन यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पिता, आई व ३५ वर्षीय वर सेल्वाकुमार यांच्यावर बालविवाह विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मुलीचे वय १५ वर्षे असून ती सध्या नववीची विद्यार्थिनी आहे. आई-वडिलांनी कर्जाच्या जाचातून सुटकेसाठी तामिळनाडूच्या सेल्वाकुमारशी कथितरीत्या लग्न लावून दिले.