धक्कादायक! 8 वर्षांच्या मुलाकडून 18 महिन्यांच्या बाळाची हत्या, मृतदेह सापडला नाल्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:30 PM2019-04-30T13:30:58+5:302019-04-30T13:31:17+5:30

देशाच्या राजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

minor kills 2 year old boy over grudge against victims sister in delhi | धक्कादायक! 8 वर्षांच्या मुलाकडून 18 महिन्यांच्या बाळाची हत्या, मृतदेह सापडला नाल्यात

धक्कादायक! 8 वर्षांच्या मुलाकडून 18 महिन्यांच्या बाळाची हत्या, मृतदेह सापडला नाल्यात

Next

नवी दिल्लीः देशाच्या राजधानीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानं एका आठ वर्षांच्या मुलानं कथित स्वरूपात दीड वर्षांच्या मुलाची हत्या केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, काही दिवसांपूर्वीच दीड वर्षाच्या मुलाच्या बहिणीनं आरोपी मुलाला धक्का दिला होता. त्यामुळे तो आठ वर्षांचा मुलगा जमिनीवर कोसळला होता. त्यानंतर त्याच्या डोक्याला सूज आली. तो राग त्या मुलानं मनात ठेवला आणि त्या दीड वर्षाच्या बाळाची हत्या केली.

दक्षिण दिल्लीतल्या फतेहपूर बेरीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. दीड वर्षाच्या मुलाच्या बहिणीनं त्या आठ वर्षांच्या मुलाला धक्का मारल्याचा राग धरून त्यानं त्या दीड वर्षाच्या बाळाचं आयुष्य संपवलं. पोलीस उपायुक्त विजयकुमार यांच्या मते, शनिवारी सकाळी मुलगा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. प्राथमिक चौकशीत दीड वर्षाचा मुलगा गायब असल्याचं समजलं. मांडी गावातल्या आपल्या घराच्या गच्चीवर शुक्रवारी रात्री ते दीड वर्षाचं बाळ आई आणि बहिणीबरोबर झोपलं होतं. जवळपास पहाटे चार वाजता ते बाळ गायब झालं. त्याच दरम्यान भाड्यानं राहणाऱ्या कुटुंबातील तो आठ वर्षांचा मुलगाही बेपत्ता होता. त्यानंतर त्या दीड वर्षाच्या बाळाचा शोध घेतला असता मृतदेह घराच्या बाहेरील नाल्यामध्ये सापडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, दीड वर्षाच्या बाळाचा डावा डोळा, पोट आणि पायावर जखमा होत्या. त्या बाळाच्या कानातून रक्तस्राव होत होता. या प्रकरणात फतेहपूर बेरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी मुलाला शनिवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलं. त्याला आता बाल न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

Web Title: minor kills 2 year old boy over grudge against victims sister in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.