मिराज खूप जुनी विमाने, कोसळणारच...! सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 01:19 PM2019-02-18T13:19:27+5:302019-02-18T13:20:39+5:30

मिराज लढाऊ विमानाच्या अपघातप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देकरखीखाली न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.

Miraj, the old aircraft will collapse ...! Supreme Court rejects plea | मिराज खूप जुनी विमाने, कोसळणारच...! सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मिराज खूप जुनी विमाने, कोसळणारच...! सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Next

नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाच्या मिराज लढाऊ विमानाच्या अपघातप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्तींनी ताशेरे ओढले आहेत. मिराज लढाऊ विमाने ही जुनाट आहेत हे बहुतेक याचिकाकर्त्यांना माहीती नसावे, त्यामुळे त्यांनी जनहित याचिका दाखल केली, असे सांगत न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी याचिका फेटाळली. 


मिराज लढाऊ विमानाच्या अपघातप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देकरखीखाली न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. गोगोई यांनी याचिकेवरील सुनावणीवेळी याचिका करणाऱ्यास ही विमाने कोणत्या पीढीतील आहेत, असा प्रश्न केला. याचिकाकर्ता या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. यामुळे त्यांनी याचिका फेटाळली. तसेच याचिकाकर्त्याला तंबी देताना गोगोई यांनी सांगितले की, नशिबवान आहात तुमच्यावर कोणताही दंड आकारला नाहीय.


याचिकेमध्ये असे सांगितले होते, की भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी एक समिती बनविली जावी जी या प्रकारच्या विमानांची तपासणी करेल. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमध्ये प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या देखरेखीखाली केली जावी. बंगळूरुमध्ये एक फेब्रुवारीला सकाळी हवाईदलाचे मिराज हे लढाऊ विमान कोसळले होते. यामध्ये प्रशिक्षणार्थी पायलट होते. या दोन्ही पायलटचा मृत्यू झाला होता. 


बंगळूरुतील एचएएलच्या विमानतळावर 1 फेब्रुवारीला सकाळी मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे दोन्ही पायलटनी हवेत विमानाला आग लागताच पॅरॅशूटच्या साह्याने उडी मारली होती. मात्र, एक पायलट विमानाच्या अवशेषांवर पडल्याने जागीच मरण पावला, तर दुसऱ्या पायलटचा उपचारावेळी मृत्यू झाला. दोन्ही पायलट प्रशिक्षणार्थी होते. त्यांचे नाव नेगी आणि अबरोल होते. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून हे विमान एचएएलद्वारे अद्ययावत केले गेले होते. तरीही या विमानाचा अपघात झाल्याने चौकशी करणार असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले होते.




एचएएल विमाने दुरुस्त करत असली तरीही अशाप्रकारे विमानांचे अपघात होणे धोक्याचे आहे. विमानात बिघाड झाल्यास किंवा आग लागल्यास पायलटना पॅरॅशूटच्या साह्याने बचावाची संधी मिळते. मात्र, या प्रकरणात असे झाले नव्हते. यामुळे हा अपघात लोकांनी गंभीरतेने घेतला होता. 
 

Web Title: Miraj, the old aircraft will collapse ...! Supreme Court rejects plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.