बँक लुटण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांच्या डोळ्यांत टाकली मिरचीपूड
By admin | Published: May 24, 2017 05:18 PM2017-05-24T17:18:52+5:302017-05-24T17:18:52+5:30
काश्मीरमध्ये आज बँक लुटण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना बँकेतील सुरक्षारक्षकांनी चांगलीच अद्दल घडवली
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 24 - दहशतवादी कारवाया, फुटीरतावाद्यांची कारस्थाने लष्करावर होणारी दगडफेक, स्थानिकांमधील असंतोष यामुळे धुमसत असलेल्या काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांनी बँका लुटण्यास सुरुवात केली आहे. मात्र आज बँक लुटण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना बँकेतील सुरक्षारक्षकांनी चांगलीच अद्दल घडवली.
काश्मीरमधील शोपियाँ भागात आज दहशतवादी बँक लुटण्यासाठी आले. तेथे उपस्थित असलेल्यांना धाकात घेतल्यावर त्यांनी सुरक्षारक्षकांची शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनीही प्रसंगाला धैर्याने सामोरे जात दहशतवाद्यांचा सामना केला. त्यांनी आपल्याकडील मिरचीपूड शस्त्रे खेचण्याचा प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांच्या डोळ्यात टाकली. अचानक झालेल्या प्रतिकारामुळे दहशतवादी गांगरले. त्यामुळे बँक लुटण्याचा त्यांचा प्रयत्नही अयशस्वी ठरला.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बँक लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत या महिन्याच्या सुरुवातीलाच कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकून 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तर कुलागाम येथील एका बॅंकेच्या एटीएम कॅशव्हॅनला दहशतवाद्यांनी लक्ष्य करत 50 लाखांच्या रोकड लुटली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पोलिसांचा समावेश होता. तसेच, दोन गार्डचीही समावेश होता.
Shopian: J&K bank"s security guard foils attempt of bank loot by throwing chilli powder in eyes of terrorists who tried to snatch his weapon pic.twitter.com/5E3Ykr7L2B
— ANI (@ANI_news) May 24, 2017