जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 07:43 PM2020-09-09T19:43:10+5:302020-09-09T19:50:15+5:30

तब्बल सहा वर्षांच्या अथ्थक परिश्रमानंतर सौरभला हे यश मिळालं आहे. 

Mirzapur boy saurabh pandey got 66 rank ias upcse 2019 exam in 6th attempt | जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला

जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला

Next

कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करायची असल्यास मेहनत आणि परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका  तरूणाबद्दल सांगणार आहोत. ज्यानं  सहाव्यांदा  युपीएससी ची परिक्षा देऊन घवघवीत यश मिळवलं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण तब्बल ५ वेळा परिक्षेत नापास होऊनही या तरूणानं हिंमत न हारता प्रयत्न सुरू ठेवले. मिर्झापूरचा रहिवासी असलेल्या या तरूणाचं नाव सौरभ पांडे आहे. या तरूणानं २०१९ मध्ये युपीएस परिक्षेत ६६ वा रँक मिळवला  होता. तब्बल सहा वर्षांच्या अथ्थक परिश्रमानंतर सौरभला हे यश मिळालं आहे. 

यूपीएससी

युपीएससीची परिक्षा पास होण्यासाठ सौरभला सहा वर्ष वाट पाहावी लागली.  बिट्स पिलानी येथून पदवी  घेतल्यानंतर नोकरी करायला सुरूवात केली.  त्यानंतर युपीएससी परिक्षा देण्याचा विचार केला. या परिक्षेसाठी त्यांना तब्बल तीन महिले तयारी केली तरिही या प्रयत्नात त्यांना अपयश आलं. अपयश आल्याचे नेहमीच  सौरभला दुःख व्हायचे. परिक्षा पॅटर्नचा अभ्यास करून त्यानं पुन्हा तयारीनिशी परिक्षेला बसण्याची तयारी केली. आता ६ व्या प्रयत्ना अखेर ते  यशाचं शिखर गाठलं.

मुलाखतीदरम्यान सौरभनं दिलेल्या माहितीनुसार मी माझ्या अभ्यासात पॅटर्न बदल्यामुळे हे यश मिळवू  शकलो. कारण कमी  गुण मिळल्यामुळे ही परिक्षा मी उत्तीर्ण होत नव्हतो. वेगवेगळ्या प्रश्नाांचा अभ्यास पेपर्स सोडवल्यानंतर माझ्यात आत्मविश्वास येऊ लागला.  काही विषयांचा अभ्यास करण्यावर जास्त भर दिला.'' अनेकजण विचार करतात की कुणीही तरूण युपीएसचीचा अभ्यास सहावेळा कसा करू शकतो. पण युपीएससीचा प्रत्येक प्रयत्न नेहमी पहिल्या  प्रयत्नाप्रमाणेच वाटतो. यशस्वा होण्यासाठी प्रत्येक प्रयत्नात सुधारणा व्हायला हवी. 

हे पण वाचा-

अरे व्वा! तिन्ही 'मेड इन इंडिया' कोरोना लसींचा पहिला टप्पा यशस्वी; लवकरच लस येणार

मक्याच्या चमकदार धाग्याचे 'हे' फायदे वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल

कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले....

Web Title: Mirzapur boy saurabh pandey got 66 rank ias upcse 2019 exam in 6th attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.