बायकोने घराबाहेर काढलं, कोट्यवधींची संपत्ती हडपली; आता नवरा मागतोय भीक, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 11:13 AM2024-02-08T11:13:33+5:302024-02-08T11:23:20+5:30
कमाल अहमद यांनी आता बॅनरवर मेसेज लिहून घेऊन मोहीम सुरू केली आहे. बायकोवर विश्वास ठेवू नका, ती तुम्हाला संपत्तीतून हाकलून देईल असं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका पतीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. तसेच एक बॅनर लावला आहे, ज्याद्वारे तो लोकांना पत्नींपासून सावध राहण्याचं आवाहन करत आहे. आपल्या पत्नीला पोटगी देण्यासाठी लोकांकडे भीक मागत आहे. त्यांची सुनावणी होत नसल्याचा आरोप देखील केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मिर्झापूर जिल्ह्यातील कटरा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील नटवा परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या कमाल अहमद यांचं 30 वर्षांपूर्वी 1992 मध्ये लग्न झालं होतं. कमाल अहमद ओमानमध्ये काम करतात. पाच वर्षांपूर्वी कमाल यांच्या पत्नीने कमाल, त्यांचा भाऊ आणि वडिलांना घराबाहेर काढल्याचा आरोप आहे. यासह त्यांची कोट्यवधींची मालमत्ता हडप केली आहे.
कमाल अहमद यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नीने आपल्यावर खोटा फौजदारी खटला दाखल केला आहे आणि पोटगीसाठी कोर्टात केसही दाखल केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सतत कोर्टात चकरा मारून त्रस्त झाल्याचं कमाल यांनी सांगितलं. कुठेही सुनावणी होत नाही.
कमाल अहमद यांनी आता बॅनरवर मेसेज लिहून घेऊन मोहीम सुरू केली आहे. बायकोवर विश्वास ठेवू नका, ती तुम्हाला संपत्तीतून हाकलून देईल असं म्हटलं आहे. तसेच सुनावणी होत नाही. मी कतारमध्ये काम करतो. 1992 साली आमचं लग्न झालं. पत्नीने खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि आता आमची संपत्ती देखील घेतली असल्याचं कमाल यांनी म्हटलं आहे.