भारताची दुुसऱ्या दिवशीही क्षेपणास्त्राची चाचणी
By admin | Published: July 2, 2016 04:07 AM2016-07-02T04:07:58+5:302016-07-02T04:07:58+5:30
भारताने इस्रायलसोबत संयुक्तरीत्या विकसित केलेल्या जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या नव्या क्षेपणास्त्राची शुक्रवारी यशस्वी चाचणी घेतली.
बालेश्वर (ओडिशा) : भारताने इस्रायलसोबत संयुक्तरीत्या विकसित केलेल्या जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या नव्या क्षेपणास्त्राची शुक्रवारी यशस्वी चाचणी घेतली. ७० कि.मी.पर्यंत मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या लष्करी अड्ड्यावर चाचणी घेण्यात आली. गुरुवारीही या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे दोन टप्पे घेण्यात आले होते. ‘चाचणी यशस्वी झाली.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची दोन दिवसांत तीन वेळा चाचणी घेऊन इतिहास घडविला,’ असे डीआरडीओच्या अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही ठरविलेली उद्दिष्टे यातून
साध्य झाली.
या क्षेपणास्त्राची गुरुवारी दोनदा चाचणी घेण्यात आली होती. भारतीय हवाई दलासाठी विकसित करण्यात आलेल्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एमआर-एसएएम) सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर एका मोबाईल लाँचरच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. (वृत्तसंस्था)