अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता तरुण चीनच्या हद्दीत आढळले, परत आणण्याची प्रक्रिया सुरू - रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 07:11 PM2020-09-08T19:11:39+5:302020-09-08T19:12:13+5:30
किरन रिजिजू यांनी सांगितले, की पीएलएने अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच युवकांचे अपहरण केल्याचे वृत्त येताच भारतीय लष्कराने चिनी लष्कराशी संपर्क साधला होता.
नवी दिल्ली -अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता झालेले 5 भारतीय युवक चीनच्या हद्दीत अढळून आले आहेत. खुद्द पिपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) याची पुष्टी केली आहे. हे युवक गेल्या तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. आता या युवकांना भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय मंत्री आणि अरुणाचल प्रदेशचे खासदार किरन रिजिजू यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
यासंदर्भात रिजिजू यांनी ट्विट केले आहे, की "चीनच्या पीएलएने भारतीय लष्कराकडून पाठविण्यात आलेल्या हॉटलाइन मेसेजला उत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता झालेले युवक त्यांच्या बाजूला आढळून आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या युवकांना आपल्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यासंदर्भात योग्यती कारवाई केली जात आहे.
China's PLA has responded to the hotline message sent by Indian Army. They have confirmed that the missing youths from Arunachal Pradesh have been found by their side. Further modalities to handover the persons to our authority is being worked out.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 8, 2020
किरन रिजिजू यांनी सांगितले, की पीएलएने अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच युवकांचे अपहरण केल्याचे वृत्त येताच भारतीय लष्कराने चिनी लष्कराशी संपर्क साधला होता. या युवकांना परत भारतात आणण्यासंदर्भात बोलणी सुरू आहे. अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसचे आमदार निनॉन्ग ईरिंग यांनी, चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने राज्यातील पाच लोकांचे अपहरण केल्याचा दावा केला होता.
निनॉन्ग ईरिंग यांनी शनिवारी ट्विट केले होते, “अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जणांचे अपहरण चीनच्या पीएलएने अपहरण केले आहे. काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती. पीएलए आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीला चोख उत्तर दिले गेले पाहिजे.”
पूर्व अरुणाचल मतदारसंघातील खासदार तापीर गावो यांनीही एक ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये गावो म्हणाले होते, "चीनच्या पीएलएने अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरीमध्ये असलेल्या मॅकमोहन लईनजवळील, सारा7 भागातून 3 सप्टेंबरपासून पाच तागीन (Tagin) युकवांचे अपहरण केल्याची माहिती आहे. अशीच एक घटना मार्च महिन्यातही घडली होती. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पार्टीविरोधात स्टँड घेण्याची वेळ आली आहे. हे पाच तरुण तागिन समाजाचे होते.
महत्त्वाच्या बातम्या -
"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"
महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार
कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!
खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी