बेपत्ता राघवेंद्रन गणेशचा ब्रसेल्स हल्ल्यातच मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

By admin | Published: March 28, 2016 10:04 PM2016-03-28T22:04:55+5:302016-03-28T22:04:55+5:30

ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर बेपत्ता झालेला इन्फोसिसचा कर्मचारी राघवेंद्रन गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे

Missing Raghavendra Ganesha dies in Brussels, information about foreign ministry | बेपत्ता राघवेंद्रन गणेशचा ब्रसेल्स हल्ल्यातच मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

बेपत्ता राघवेंद्रन गणेशचा ब्रसेल्स हल्ल्यातच मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 28 - ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर बेपत्ता झालेला इन्फोसिसचा कर्मचारी राघवेंद्रन गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 22 मार्चला झालेल्या ब्रसेल्स हल्ल्यात राघवेंद्रन गणेशचा मृत्यू झाला आहे. ब्रुसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर भीषण बॉम्बस्फोट झाला होता. मेट्रो स्टेशनवर स्फोट झाला तेव्हा राघवेंद्रन गणेश तिथेच उपस्थित होता ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. 
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. बेल्जिअम अधिका-यांनी राघवेंद्रन गणेशची ओळख पटवली असून 22 मार्चला मेट्रो स्टेशनवर झालेल्या स्फोटात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मेट्रो स्टेशनवर झालेल्या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला होता. 
 
ब्रसेल्समधील दहशतवादी हल्ल्यानंतर राघवेंद्रन गणेश बेपत्ता झाला होता. बेपत्ता झाल्यानंतर गणेशच्या शोधासाठी सर्वोपतरी प्रयत्न सुरु होते. गणेशने शेवटचा दूरध्वनी मेट्रो स्थानकावरून केल्याची माहिती देखील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरूवारी दिली होती. मात्र गणेशचा शोध लागत नव्हता. 
 
ब्रुसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर मंगळवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास जेवेन्तम विमानतळाच्या मुख्य कक्षात दोन स्फोट झाले. त्यानंतर काही वेळातच युरोपीय संघाच्या मुख्य इमारतीजवळ मालबिक मेट्रो स्टेशनवर तिसरा स्फोट झाला. कार्यालयीन वेळ असल्याने मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी होती. तर विमानतळावरही चेक इन करण्यासाठी हजारो प्रवासी प्रतीक्षेत होते. 
 

Web Title: Missing Raghavendra Ganesha dies in Brussels, information about foreign ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.