Mission Shakti: अहो मोदी, हे मिसाईल भाजपाने बनवलंय का?; ट्रोल झाले पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 07:56 PM2019-03-27T19:56:45+5:302019-03-27T20:00:55+5:30
मोदींच्या घोषणेनंतर अनेकांनी डीआरडीओचे कौतुक केलं मात्र ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का केली इतकंच नाही तर मोदींनी निवडणुकीचा टाईमिंग साधला असल्याची टीका नेटीझन्सकडून व्यक्त करण्यात आली.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाला संबोधित करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. भारताने अंतराळात आपलं नाव कोरलं असून अवकाश संशोधनात भारताला मोठ यश मिळाल्याचं सांगितले. भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं 300 किमी दूरवर असलेला उपग्रह पाडला आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. या घोषणेनंतर अनेकांनी डीआरडीओचे कौतुक केलं मात्र ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का केली इतकंच नाही तर मोदींनी निवडणुकीचा टाईमिंग साधला असल्याची टीका नेटीझन्सकडून व्यक्त करण्यात आली.
सेटलाईट पाडल्यामुळे, शास्त्रद्यांचं अभिनंदन करण्यासाठी, निवडणूक आचार संहिता असताना देशाला उद्देशून सांगण्याची आवश्यकता होती काय?
— YASHWANT KANADE (@yashwant_kanade) March 27, 2019
माझा निवडनुक आयोगाला एक सरळ प्रश्न आहे. आयत्या निवडनुकांच्या तोंडावर अशी घोषणा केली जाते तसेच ह्या घोषणेची जाहीरात बाजी मोदी, भाजप आणि त्यांच्या घटक पक्षाच्या उमेदवारांकडुन होते. तर यावर निवडणुक आयोग काय कारवाइ करणार@ECofIndia@TOIIndiaNews@abpmajhatv@TV9Marathi@mnsadhikrutpic.twitter.com/BQ8oNg9Q42
— अनिल भोसले. (@Abhosale7) March 27, 2019
अख्खा मिसाईल मोदींनी बनवलाय. तो एक उपग्रह पाडला ना तेव्हा पण मोदी स्वत: घेवून गेले होते मिसाईल, नाहीतर इतका चांगला नेम कसा लागला असता. कोणी काही बोलायच नाही. सगळ क्रेडीत त्यांनाच भेटल पाहिजे. #MissionShakti#राजकारण#मराठीकट्टाpic.twitter.com/wsn3mYLonU
— ‘शेतकरी’ पाटील बुवा (@Bin_Pagari) March 27, 2019
👉#MissionShakti उदघोषणा मोदींनीच करावी अस काही नव्हतं पण मोदी स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवू शकले नाही, हे अति होतेय.
— मार्मिक (@Rajgurunagar) March 27, 2019
👉राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरण असल्याने आचारसंहितेला यशस्वीरित्या बगल दिली.
👉पुरावे'गँगने विलाप करायला सुरू करावे, आम्ही पॉपकॉर्न घेऊन तयार आहोत.
किती हा #ड्रामा ! एखाद्या गोष्टीचे श्रेय घ्यायची सवय लागली की माणूस की वेड्यासारखं करू शकतो हे आज साऱ्या देशाने पाहिले.हे तंत्रज्ञान जणू BJP ने तयार केले आहे असे शेठचे हावभाव होते.
— रवी गोन्यल 9⃣ (@ravigonyal1979) March 27, 2019
निवडणुकीच्या तोंडावर हे करण म्हणजे फक्त सहानभूती घेणे
— Sameer M Takalkar (@takalkar_sameer) March 27, 2019
आज पुन्हा एखादा दिसून आलं की निवडणूक आयोग हे भाजपा सरकारच्या मनावर चालत कारण आचारसंहिता लागू असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांशी संवाद साधण्याची परवानगी दिली कशी..? @dhananjay_munde@NCPspeaks
— Ram Gitte (@RamGitte7) March 27, 2019
एक चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राने उपग्रह यशस्वीपणे पाडले त्याबद्दल सर्व वैज्ञानिकांचे खूप खूप अभिनंदन!!
— SAURABH HEMANTRAO DESHMUKH (@saurabh__speaks) March 27, 2019
पण ही बातमी सांगण्याची पंतप्रधानांनी का तसदी घेतली,ते ही आचारसंहिता असताना! पंतप्रधान कार्यालयात कोणीच नव्हता का आज?